डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास दलित पँथरची मानवंदना

पुणे: 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधा स्वीकारले आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणाशिवाय संविधान दिनाचे सेलिब्रेशन अपूर्ण आहे.
“डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” यांनी “2 वर्ष 11 महिने 18 दिवस” एवढ्या कालावधीमध्ये “395 कलमे आणि 8 परिशिष्टे” लिहून जगातील सर्वात महान बलशाली राज्यघटना लिहिली.
७१व्या भारतीय संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे स्टेशन येथील परमपूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पँथर स्टाईल मानवंदना दलित पँथर तर्फे देण्यात आली. दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यावेळी उपस्थित होते. यावेळी पुण्याचे खासदार मा. गिरीष बापट, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे आमदार सुनील कांबळे, पंचशील वेलफेर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष इरण्णा नडगम यांच्या शुभ हस्ते महामानवाला मानवंदना देण्यात आली. तसेच अमोल पवार यांनी भारतीय संविधानाच्या प्रतचे वाचन केले.
यावेळी प्रिन्स कांबळे, अनमोल नडगम, ओंकार नडगम, किरण ठोंगे, अजय वंदगळ, जॅक्सन पॅनम, जॅक्सन ऍंथोनी, अतुल घायतडके, पप्पू गायकवाड, जॉनसन ऐडी, अमोल पाटोळे, विपीन नायर, मुकेश वाघमारे, लखन मिसाळ, आकाश पवार, संभाजी पवार यांनी उपस्थिती लावली.