महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल- डॉ. नीलम गोऱ्हे
अमोल रासकर (विभागप्रमुख) यांच्यावतीने 'घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

पुणे: केंद्रात जरी सरकार आपल नसेल तरी राज्यत शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई सोबत पुण्यात देखील भगवाच फडकेल अशा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यातील सरकार नागरिकांना हिताचे काम करत असून. त्याच जोडीला तमाम शिवसैनिकांनी उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, सचिन आहिर, शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
शिवसेना पुणे पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख अमोल रासकर यांच्यावतीने ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित केली होती. इंदिरा नगर, बिबवेवाडी येथील नागरिकांनी स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद देत जवळपास पाचशेहून अधिक कुटुंबांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते रविवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. बक्षीसामध्ये सन्मानचिन्ह, मानपत्र तसेच तिसऱ्या क्रमांकाला तिसऱ्या क्रमांकाला वाशिंगमशीन, दुसऱ्या क्रमांकाला फ्रिज, तर प्रथम विजेत्याला टिव्ही बक्षीस म्हणून दिला गेला. सोबतच उत्तेजनार्थ स्पर्धकांना व सहभागी प्रत्येक कुटुंबाला बक्षीसाचे वितरण यावेळी करण्यात आले.
दुर्गामाता मंदिर, इंदिरा नगर, बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या या बक्षीस वितरित समारंभाला शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक बाळा ओसवाल, युवासेनेचे किरण साळी, विषेश कार्यकारी अधिकारी पुजा अमोल रासकर, पर्वती मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक, परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.