क्रीडापुणेविशेषशैक्षणिक

आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा

वॉरीयर्स, आझम स्पोर्ट्स संघांचे दणदणीत विजय

पुणे: वॉरीयर्स, आझम स्पोर्ट्स अकादमी संघांनी अनुक्रमे आर्यन्स व डार्क क्रिकेट अकादमी संघाना पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित टी -२० क्रिकेट स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये वॉरीयर्स संघाने आर्यन्स संघाला १४६ धावांनी पराभूत केले.

वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद १७९ धावा केल्या. श्रद्धा गिरमेने धडाकेबाज खेळी करताना ५७ चेंडूत १० चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. तिला अदिती वाघमारेने ४१ चेंडूत ६ चौकारांच्या सहाय्याने ५० धावांची खेळी करताना सुरेख साथ दिली. कर्णधार उत्कर्षा कदमने आक्रमक ३० (१७ चेंडू, ४ चौकार) धावांची खेळी केली. आर्यन्स संघाकडून मन्सा कपूर व श्रावणी जामदार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.ज्ञानेश्वरी पाटीलच्या भेदक गोलंदाजीने आर्यन्स संघाचा डाव १०.५ षटकांत सर्वाबाद ३३ धावांवर संपुष्टात आला. भक्ती पवार ११ (२१ चेंडू, २ चौकार) तर कर्णधार श्रावणी जामदार ११ (१४ चेंडू, १ चौकार) यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

ज्ञानेश्वरी पाटीलने ३ तर सई चव्हाण, अदिती वाघमारे व उत्कर्षा कदम यांनी प्रत्येकी २ गडी बाद केली.दुसऱ्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने डार्क अकादमी संघाला ६ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना डार्क अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद १४८ धावा केल्या. नीतीने ४७ (५५ चेंडू, ७ चौकार), ईशा घुलेने नाबाद ३२ (१२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), कर्णधार श्वेता जाधवने ३१ (३१ चेंडू, ४ चौकार) तर क्रीशी ठक्करने १७ (२० चेंडू, २ चौकार) धावांची खेळी केली. जाई शिंदे व संजना शिंदे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने केवळ १५.४ षटकांत ४ बाद १५१ धावा करताना विजय साकारला. ऋतुजा गिलबिलेने ५२ (३५ चेंडू, ९ चौकार) तर मानसी तिवारीने ५० (३९ चेंडू, ६ चौकार) धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. किरण नवगिरेने ९ चेंडूत २५ धावांची (१ चौकार, ३ षटकार) आक्रमक खेळी केली. ईशा घुलेने २ तर पूनम मुळेने १ गडी बाद केला. धावफलक :वॉरीयर्स : २० षटकांत ३ बाद १७९ : श्रद्धा गिरमे ६७ (५७ चेंडू, १० चौकार), अदिती वाघमारे ५० (४१ चेंडू, ६ चौकार), उत्कर्षा कदम ३० (१७ चेंडू, ४ चौकार), मन्सा कपूर ४-०-२७-१, श्रावणी जामदार ३-०-२३-१ विजयी विरुद्ध आर्यन्स : १०.५ षटकांत सर्वाबाद ३३ : भक्ती पवार ११ (२१ चेंडू, २ चौकार), श्रावणी जामदार ११ (१४ चेंडू, १ चौकार) ज्ञानेश्वरी पाटील ४-०-११-३, उत्कर्षा कदम १-१-०-२, अदिती वाघमारे १.५-०-७-२, सई चव्हाण ४-०-१५-२.

डार्क अकादमी : २० षटकांत ३ बाद १४८ : नीती ४७ (५५ चेंडू, ७ चौकार), ईशा घुले नाबाद ३२ (१२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), श्वेता जाधव ३१ (३१ चेंडू, ४ चौकार), क्रीशी ठक्करने १७ (२० चेंडू, २ चौकार) संजना शिंदे २-०-८-१, जाई शिंदे ४-०-२९-१ पराभूत विरुद्ध आझम स्पोर्ट्स अकादमी : १५.४ षटकांत ४ बाद १५१ : ऋतुजा गिलबिले ५२ (३५ चेंडू, ९ चौकार), मानसी तिवारी ५० (३९ चेंडू, ६ चौकार), किरण नवगिरे २५ (९ चेंडू, १ चौकार, ३ षटकार), ईशा घुले ४-०-३२-२ पूनम मुळे २-०-१७-१.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!