
पुणे: कात्रज डेअरी ते वंडर सिटी या तब्बल २५ वर्षांपासून रखडलेला रस्त्याचे काम आपण वेळोवेळी पाठपुरावा करत पूर्णत्वास आणले आहे. आज या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
मा. अजितदादा यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दादांनी काढलेले गौरवोद्गार आणि पाठीवर दिलेली शाबासकीची थाप ही भविष्यात नव्याने काम करण्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप, श्री. आप्पासाहेब रेणुसे, नगरसेवक श्री. विशाल तांबे, श्री. विष्णूकाका हिंगे, श्री. प्रकाशशेठ कदम, श्री. बाळाभाऊ धनकवडे, मा. अमृताताई बाबर, मा. स्मिताताई कोंढरे, मा. अश्विनताई भागवत, श्री. नानासाहेब जगताप, श्री. संतोष फरांदे, श्री. किशोर कांबळे, श्री. चेतन मांगडे, श्री. सचिन दांगट, श्री. नानासाहेब निवंगुणे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.- आपला नगरसेवक, युवराज बेलदरे