
पुणे: कोयना आणि राज्यातील महत्वाच्या पाटबंधारे प्रकल्पांवर अभियंता म्हणून योगदान देणारे अभियंता दीपक मोडक यांच्या रायमुनिया या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ १९ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूटच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित या कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी गिरीश कुलकर्णी (अभिनेता आणि लेखक) उमेश कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शक) आणि ज्येष्ठ पत्रकार,टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्यूसर समीरण वाळवेकर उपस्थित राहणार आहेत.
रायमुनिया म्हणजे रानपाखरांनी खाण्यासाठी असलेली फळं म्हणजे करवंद, जांभळं ,टंटणीची फळे , रानमेवा असा अर्थ असून मानवी जीवनाला स्पर्शणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत.दीपक मोडक हे जागतिक बँकेच्या डॅम रिहॅबिलेटेशन अॅण्ड इंप्रुव्हमेंट प्रोजेक्ट -२ साठी पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच हायड्रोपॉवर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
या प्रकाशन समारंभासाठीचा प्रवेश कोविड परिस्थितीतील नियमांनुसार निमंत्रितांसाठीच आहे.