पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

सौ. साधना दातीर प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त

३३ वर्ष केले अध्यापनाचे कार्य

पुणे: निगडी प्राधिकरण सिंधूनगर येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,आकुर्डी येथील प्राचार्या मा. सौ. साधना दातीर यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक मा.श्री.प्रा. गोविंदरावजी दाभाडे उपस्थित होते. नवनगर शिक्षण मंडळाचे सचिव मा.श्री.अजित गरुड, सामाजिक कार्यकर्त्या व ईवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदाताई अगरवाल, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव मा.श्री.शांताराम पोखरकर, पत्रकार प्रीतम शहा, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत अभोणकर , सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.नंदा पाटील, स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर सहयोगनगरचे मुख्याध्यापक श्री. राजू माळे, माध्यमिक विद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. विजय बच्चे, पर्यवेक्षिका सौ.सुरेखा वाळुंज , सरस्वती विद्यालयातून सेवानिवृत्ती झालेले अनेक सेवानिवृत्त शिक्षक, तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षिकांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. नवनगर शिक्षण संस्थेचे संस्थापक मा.श्री.प्रा. गोविंदरावजी दाभाडे सर व नवनगर शिक्षण मंडळाचे सचिव मा.श्री.अजित गरुड यांनी प्राचार्या मा. सौ. साधना दातीर यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत केले.

सरस्वती माध्यमिक व सरस्वती प्राथमिक विभागातर्फे प्राचार्या मा. सौ. साधना दातीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या मा. सौ. साधना दातीर यांनी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक मा.श्री.प्रा. गोविंदरावजी दाभाडे सर व नवनगर शिक्षण मंडळाचे सचिव मा.श्री.अजित गरुड यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सौ. साधना दातीर यांच्या वतीने शाळेला सरस्वती मूर्ती व संपूर्ण साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली.

“दातिर यांनी ३३ वर्षे विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अध्यापन केले. शालेय कामकाज करत असताना सामाजिक कार्य देखील सुरू ठेवले. त्यांनी पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम केले. विज्ञान अध्यापक संघ, इसीए संस्था, दिवा फाउंडेशन, मानिनी फाउंडेशन यांसारख्या संस्थांमध्ये सुद्धा काम केले. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघात त्या सन २००२ पासून विद्या सहसचिव म्हणून कार्य करत आहेत तर पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि त्यांनी अडीच वर्ष कार्य केलेले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची पावती म्हणून त्यांना आजतागायत विविध शासकीय संस्था आणि सामाजिक संस्था यांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविलेले आहे ,” असे मत शिक्षकांच्या वतीने श्री. जगदीश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त होणाऱ्या दातीर मॅडम यांच्या कार्याचा गुणगौरव करताना व्यक्त केले.”

साधना दातीर मॅडम यांनी प्राचार्य पदाची व संस्थेने दिलेली सर्व जबाबदारीची कामे पार पाडलेले आहेत. कोणतेही कार्य करत असताना त्यांनी नियोजन करून त्या नियोजनाप्रमाणेच कार्य करणे हे त्यांचे एक गुणवैशिष्ट्य आहे. दातीर मॅडम जरी सेवानिवृत्त होत असल्या तरी भविष्य काळात ही त्या आपले सामाजिककार्य चालूच ठेवतील याची मला खात्री आहे ” असे मत संस्थेचे संस्थापक नवनगर शिक्षण मंडळाचे सचिव मा.श्री.अजित गरुड यांनी आपल्या व्यक्त केले.

मा.श्री.प्रा.गोविंदरावजी दाभाडे सर यांनी व्यक्त केले.” आज माझ्या सेवानिवृत्ती निमित्त तुम्ही या कार्यक्रमाचे जे आयोजन केलेले आहे त्यासाठी मी सर्व प्रथम संस्थेचे संस्थापक मा.श्री.प्रा.गोविंदरावजी दाभाडे सर यांचे आभार मानते.येथील सर्व सहकारी माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे मी माझी ३३ वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करू शकले. भविष्यकाळातही संस्था व शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशीच माझी प्रार्थना राहील ,” असे मत आजचे सत्कारमूर्ती सौ.साधना दातीर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.” आज आपल्या शाळेच्या प्राचार्या सौ.साधना दातीर या शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत.इतक्या वर्षाच्या कार्यामध्ये सवलत न घेता तसेच केलेल्या कार्यामध्ये त्यांनी कधीही तक्रार करण्याची संधी दिली नाही.

इथून पुढे त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत सुखासमाधानाने जगावे अशा शुभेच्छा देतो “, असे मत संस्थेचे संस्थापक मा.श्री.प्रा.गोविंदरावजी दाभाडे सर यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. अविनाश कांबळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.जयश्री घावटे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सोनाली कापडणीस , सूत्रसंचालन सौ.सरिता खेनट व आभार श्री. परशुराम रेंगडे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!