आरोग्यमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

गरोदरपणात माता आनंदी व सकारात्मक राहण्यासाठी दुसर्‍यांदा गरोदर मातांना रॅम्प वाकचे माध्यम उपलब्ध

नगरमध्ये महाराष्ट्र दिनी भव्य दिव्य ‘अहमदनगर फॅशन रनवे 2022’ चे आयोजन

नगर : करोना महामारीचे सावट आता बर्‍यापैकी दूर झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण नव्या जोशात भरारी घेण्यास सज्ज झाले आहेत. याच सकारात्मक वातावरणात नगरमध्ये दि. 1 मे रोजी नंदनवन लॉन्स येथे सायंकाळी 4.30 वाजता भव्य दिव्य अशा अहमदनगर फॅशन रनवे 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

या फॅशन रनवेमध्ये गरोदर मातांनाही समावून घेण्यात आले आहे. गरोदरपणात माता जितकी आनंदी व सकारात्मक असेल तितके बाळंतपण चांगले होते हे आता शास्त्रीय अभ्यासातही सिध्द झाले आहे. त्यामुळेच सरस्वती हॉस्पिटलने नगरमध्ये दुसर्‍यांदा गरोदर मातांना रॅम्प वाकचे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय नवविवाहित जोडप्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे, त्यांच्यातील नात्याचे बंध अधिक घट्ट व्हावेत यासाठी त्यांचीही वेगळी कॅटेगरी यात आहे. संसारात मग्न झालेल्या जोडप्यांनाही नव्याने एकमेकांना समजून घेण्याची, रोजच्या चक्रातून बाहेर पडत एकमेकांसमवेत निखळ आनंद मिळवण्याची संधीही या शोमध्ये आहे. याशिवाय आई व मुलीचे अतिशय प्रेमळ नात्याची गुंफणही रॅम्पवरुन सर्वांना कळावी यासाठी आई आणि मी ही कॅटेगरीही ठेवण्यात आलेली आहे. विवाहित महिलांनाही परिघाबाहेर पडून खास स्वत:चा असा आनंद मिळावा यासाठी त्यांच्यासाठीही स्वतंत्र कॅटेगरी आहे. महानगरांमधील ग्लॅमरस असा फॅशन शो थेट नगरमध्ये होत असल्याने प्रत्येक सहभागीला एक मोठं व निखळ आनंद देणारे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयोजक सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल जाधव यांनी दिली.

आताच्या काळात दूरचित्रवाणी, इंटरनेटमुळे जगभरातील फॅशन शो, तेथील मॉडेल्सचे सादरीकरण सर्व जण पाहत असतात. नगर शहरातही असा आधुनिक काळातील फॅशन शो घ्यावा, स्थानिक टॅलेंटला व्यासपीठ मिळावे हा उदात्त उद्देश समोर ठेवून फॅशन कार्निव्हलने न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे या भव्य दिव्य अहमदनगर फॅशन रनवेचे आयोजन केले आहे. यात मिस (16 वर्षांवरील), मिसेस, नवविवाहित कपल, गरोदर माता, कपल, मुलगी व आई अशा कॅटेगरीज आहेत. रॅम्प वॉकच्या 10 राउंडचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण इव्हेंट अनुभव असलेली फॅशन कार्निव्हलची टिम संचालित करणार आहे. ऑडिशन रविवार दि.24 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत न्यू टिळक रोडवरील हॉटेल पॅराडाईज येथे होणार आहे. या फॅशन रनवेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या सर्वांचे ऑडिशन होवून अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.

ग्लॅमर इंडस्ट्रीतील प्रसिध्द फॅशन मॉडेल तसेच शो डायरेक्टर खुशबू जोशी, स्नेहल पाटील, गौरी शितोळे आणि त्यांची टिम ऑडिशन घेवून अंतिम निवड करणार आहेत. तसेच शोसाठी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत. चार तासांच्या या शोमध्ये दहा डिझायनर फॅशन राउंड असणार आहेत. भव्य एलईडी स्क्रीन, प्रशस्त रॅम्प, सेलिब्रिटी अँकर असा सर्व थाटमाट असणार आहे. सहभागी स्पर्धकांसह फॅशन इंडस्ट्रीतील प्रोफेशनल मॉडेल्सचाही स्वतंत्र रॅम्पवाक कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे. नगर शहर वेगाने बदलत आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करताना आजच्या काळातील फॅशन इंडस्ट्रीत करियर करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी नगरमध्येच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अभिनव प्रयत्न या कार्यक्रमातून होत आहे.यातून अनेकांची मॉडेल क्षेत्रातील करियरची पायाभरणी होवू शकते.

सरस्वती हॉस्पिटलने हा शो आयोजित केला टायटल स्पॉन्सर महावीर ग्रुप आहे. शोसाठी स्पॉन्सर आणि पार्टनर आय लव्ह नगर, हॉटेल नंदनवन, फॅशन कार्निव्हल, रेडिओ सिटी, अहमदनगर स्टोरीज, न्यूक्लियस हॉस्पिटल, ओस्तवाल किचन्स, श्रीमान, नारी फॅशन्स, स्मित डेंटल क्लिनिक, कास्ट इंडिया, रेनड्रॉप फोटोग्राफी, हॉटेल पॅराडाईज, चंगेडिया आऊटडोअर्स, गुड गिफ्ट 24, आयएएफडी, साईटेक, प्रगती डेव्हलपर्स, वेदांग, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब आहेत. नगरमध्येच प्रथमच अशा प्रकारचा अतिशय प्रोफेशनल व महानगरांच्या धर्तीवरचा फॅशन रनवे होत आहे. यातून नगरची एक नवी व वेगळी ओळख देशात पोहचणार आहे. या शोसाठी नाव नोंदणी सुरु असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा : 9356280050/9890726666.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!