कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२ आंतरशालेय संगणककौशल्य स्पर्धा

पुणे: आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन व युनियन बँक ऑफ इंडिया, मास्टरकार्ड यांच्या संयुक्त विद्यमानानें ‘आंतरशालेय कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धा जाहीर करीत आहोत. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून गेल्या दहा वर्षात पुणे, महाराष्ट्र, गुजरात तसेच अमेरिका आणि ब्राझील येथील संघांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमधील ही कौशल्ये वृद्धिंगत होण्यासाठी कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करणारी पुणे शहरातील नामांकित शाळांपैकी एक शाळा अशी आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेची ओळख झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या तंत्रज्ञान विषयक कौशल्यांतून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा म्हणजे एक उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांच्या संगणकीय कौशल्यांना व सर्जनशीलतेला अधिकाधिक वाव मिळावा यासाठी ‘कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप २०२२’ ही स्पर्धा एक उत्कृष्ट माध्यम असून सुभाष परमार संस्थेचे चेअरमन यांनी विद्यार्थ्यांमधील संगणकीय ज्ञानाला योग्य दिशा देण्यासाठी सर्व शाळांना आज पत्रकार परिषदेत आवाहन केले.
ही स्पर्धा SCRATCH ‘ या प्रोग्रामिंग भाषेत घेण्यात येणार आहे. www.scratch.mit.edu या संकेत स्थळावर हे सॉफ्टवेअर निःशुल्क उपलब्ध आहे. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात.
स्पर्धा दोन गटांमध्ये घेतली जाईल.
पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी
दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी
प्रत्येक गटामध्ये प्रत्येक शाळेतील जास्तीत जास्त संघ सहभाग घेऊ शकतात. तसेच दोन विद्यार्थ्यांचा संघ करून सहभाग विद्यार्थी नोंदवू शकतात.
स्पर्धेचे विषय
पहिला गट
१) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – उपेक्षित स्वातंत्र्य सैनिक
२) मी आणि माझे आजी आजोबा
3) ‘0’ (शून्य) – गणिताचा नायक
4) पर्वत – आपला नैसर्गिक खजिना
दुसरा गट
१) वीर कथा – कथा परमवीर चक्र प्राप्तकर्त्याची
२) विद्यार्थ्याच्या जीवनाचा प्रवास – बाल्यावस्था ते किशोरावस्था
3) IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) – जग बदलण्याची शक्ती
4) संस्कृत – भाषांची जननी
उपरोक्त विषयास अनुरूप जास्तीत जास्त ५ मिनिटांचे सादरीकरण कथा किंवा खेळ या स्वरूपात करावयाचे आहे.
पहिल्या फेरीचे परीक्षण हे विषयाची निवड, सर्जनशीलता, सादरीकरण कौशल्य, संगणक प्रभुत्व, वेळेचे नियोजन इ. गोष्टींचा सारासार विचार करून केले जाईल.
या फेरीत निवडले गेलेले संघ शनिवार दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी उपांत्य फेरीत सादरीकरण करतील.
अंतिम फेरीत दोन्ही गटातून निवडले गेलेले संघ शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामधील प्रख्यात संगणक तज्ञांच्या समोर टिळक स्मारक मंदिर पुणे आपले सादरीकरण करतील. अंतिम फेरीतील सादरीकरणानंतर त्याच व्यासपीठावरून विजेते संघ घोषित करण्यात येतील.
• पारितोषिके
प्रत्येक गटासाठी
प्रथम पारितोषिक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रुपये ४०००/-
पारितोषिक – स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रुपये ३०००/-
तृतीय पारितोषिक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रुपये २०००/-
तसेच दोन्ही गटांमधून
उत्कृष्ट ऍनिमेशन
उत्कृष्ट सर्जनशीलता
अव्दितीय संकल्पना
सामाजिक संदेश
अशा विभागांसाठी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
• विजेत्या संघाच्या व विशेष पारितोषिक विजेत्या संघांच्या शिक्षकांसाठी रोख पारितोषिक
• स्पर्धेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास सहभाग प्रशस्तीपत्र
• महत्वाचे –
स्पर्धा नाव नोंदणी
स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी प्रत्येक गटातील प्रत्येक संघासाठी गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करावी.
पहिला गट गुगल फॉर्म लिंक –
https://forms.gle/p1w8CHGoEvLSuEN77
दुसरा गट गुगल फॉर्म लिंक –
https://forms.gle/xLRksMbFQwLpStnM6
शनिवार, दिनांक २० ऑगस्ट २०२२ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. बुधवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रकल्प ई मेल द्वारे vvscomputer@gmail.com देणे आवश्यक आहे.
उपांत्य फेरी शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ महाअंतिम फेरी शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२
या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळेतील शिक्षकांसाठी scratch software’ चे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी vvscomputer@gmail.com
किंवा ०२०-२६३८४९३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
शिक्षणतज्ञ् डॉ.अ.ल.देशमुख व मालिनी कल्याणीवाला यांचे देखील मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मानसी मारुलकर व संगणक शिक्षकांनी या स्पर्धेचे संयोजन केले आहे.