पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

शिवसेनेचे प्रसाद काकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सदैव सुरू असणार :काकडे

पुणे: शिवसेना कसबा विधानसभा उप-प्रमुख प्रसाद शिवाजीराव काकडे आणि शिवसेना महिला आघाडी प्रज्ञा प्रसाद काकडे यांच्या प्रभाग क्रमांक १७ शनिवार पेठ – राजेंद्र नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते रविवार दि ०६ मार्च २०२२ रोजी करण्यात आले.

या प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक विशाल धनवडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव किरण साळी, रमेश लडकत, उमेश गालिंदे, नितीन परदेशी, संदिप गायकवाड,चंदन साळुंखे, गणेश घोलप, अनंत घरत, नंदकुमार येवले, सुरेंद्र जोशी, मोहन देशपांडे, नितीन रावळेकर, राजेश मांढरे, गोरख बांदल, गौरव नवले, युवासेनेचे निरंजन दाभेकर, सुरज चर्हाटे, सुरज मालुसरे महिला आघाडीच्या स्वाती मोहोळ, किर्ती मोहोळ, मनिषा फाटे,भाग्यश्री जाधव, वैजयंती फाटे, सारिका घोले, मिनाक्षी माझिरे, अपर्णा अल्हाट, कार्यक्रमाचे सर्व नियोजन शाखाप्रमुख राहुलजी शिंदे व युवासेनेचे विलास नावडकर, राहुल बामणे,विकी रणदिवे, निलेश ओव्हाळ,तेजस ननावरे, सचिन सुतार, कुणाल पाटेकर, अमित चव्हाण, अभिजित गजधने, अथर्व ढमाले, शुभम तांदळे व आनंद वाघचौरे यांनी केले होते.

यावेळी बोलतांना सचिन अहिरे म्हणाले की, जनतेशी सातत्याने संपर्कात राहायचं असल्यास जनसंपर्क कार्यालयाची गरज आहे त्यामुळे अधिक अधिक नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी मदत होते. कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे अधिक अधिक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.

बोलताना प्रसाद काकडे म्हणाले, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांनी आपले अधिक अधिक प्रश्न सोडवून घ्यावेत. त्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सदैव सुरू असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!