पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

‘AI वरदान की शाप’ विषयावर आंतरशालेय वादविवाद स्पर्धा २०२४

पुणे, (शिवाजीनगर): विद्या प्रसरणी सभा संचालित विद्या वर्धनी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे आयोजन शाळेच्या सभगृतात करण्यात आले होते. कै. डॉ. जी व्ही शिंगरे यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ ही स्पर्धा घेण्यात येते. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण १२ शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्पर्धेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) वरदान किंवा नुकसान हा विषय देण्यात आला होता. विषयाचे अभ्यासपूर्ण विवेचन विद्यार्थ्यांनी केले होते.

पहिले पारितोषिक विद्या वर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्यु. कॉलेज ने द्वितीय पारितोषिक श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल ने तर तिसरे पारितोषिक डी.ई.एस इंग्लिश मीडियम शाळेने पटकवले. विजेत्या स्पर्धकांना मेडल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण महाराष्ट्र शासन संचालक श्री. एस. एम. पवार, विद्या प्रसारिणी सभा सचिव डॉ.सतीश गवळी, सहसचिव विजय भुरखे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप अग्रवाल, सौ. अग्रवाल, समितीचे सदस्य सुभाष मेहता, माजी नगरसेविका सौ.लांडगे ताई, आबासाहेब अत्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. चंचल ललवाणी, राज्य शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. सपाटे, भरत इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या वर्षा मॅम, विद्या वर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रेणू सुंबळी मॅम आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी प्रा. लतीफ एम. टी. सर सेवानिवृत्त (भारती विद्यापीठ, पुणे), ताराबाई शंकरलाल मुथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सौ. स्वाती आंधळे, आबासाहेब गरवारे कॉलेजच्या डॉ. संपदा तिवारी यांनी पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता जाधव आणि मोहिनी भोकरे यांनी सोबतच अनिकेत कलांगे आणि स्वराज तुंगतकर या विद्यार्थ्यांनी देखील सूत्रसंचालनाचा कारभार सांभाळला तर आभार पी. राजेश्वरी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!