पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

पुणे लोकसभेसाठी हेमंत पाटील यांनी भरला अर्ज

Pune: इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष व अपनी प्रजा हित पार्टीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांनी आज बुधवार दिनांक २४ में रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरला. अनोख्या पद्धतीने क्रिकेट युनिफॉर्म मध्ये खेळाडूंच्या समवेत त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे अपनी प्रजाहित पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे शहराच्या विकासासाठी आवश्यक कामे होणे गरजेचे होते. मात्र अद्याप देखील कोणतेही भरीव काम पाहायला मिळत नाही. पुणे शहरात देश भरातून विद्यार्थी येत असतात त्यांना उत्तम शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याच्या दृष्टीने त्या संदर्भातील सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे मत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, माहायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने वसंत मोरे यांचे आव्हान आता हेमंत पाटील यांच्या समोर असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!