देश-विदेशमनोरंजनव्यवसायीक

अभिनेत्री सिमरन आहुजाने केले ‘द निश फॅशन एरिना इंटरनॅशनल’च्या नविन अंकाचे अनावरण

मासिकातून दोन देशांमधील फॅशन परिस्थितीची होते देवाणघेवाण- सायरस पेस्टनजी

पुणे: अभिनेत्री सिमरन आहुजा यांनी फॅशन ट्रेंड मधील विषयावर प्रकाश टाकत भारतातील आंतराष्ट्रीय ‘द निश फॅशन एरिना इंटरनॅशनल’ या त्रैमासिकाच्या नविन अंकाचे अनावरण केले. यावेळी द निश फॅशन एरिना इंटरनॅशनल द्वारे शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मासिकाचे सीईओ आणि संस्थापक सायरस पेस्टनजी, प्राजक्ता अल्बुकर्क (फॅशन क्रिएटिव्ह डायरेक्टर), अमर शम्मू, आंतरराष्ट्रीय पेजेंट संचालक) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मानवाधिकार संघटनेचे चिराग आसवानी, राउंड टेबल इंडियाचे संचालक मॉडेल अभिनेत्री संपदा वाळे व इतर अनेक जण उपस्थित होते.

शो दरम्यान नियुक्त केलेल्या ज्युरीं पॅनेलच्या निर्णयानंतर तीन डिझायनर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.मॅगझिनच्या नवीन अंकाचे अनावरण कव्हर गर्ल, अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय अँकर आणि सांस्कृतिक राजदूत सिमरन आहुजा यांच्या हस्ते करण्यात आले असून हे फॅशन मासिक जागतिक आहे आणि देशातील हे एकमेव भारतीय फॅशन मासिक आहे. हे Amazon Global वर उपलब्ध आहे आणि वाचक जागतिक स्तरावर कोणत्याही देशातून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. हे मासिक अधिकृतपणे NICHE नावाच्या मासिकाशी जोडलेले आहे आणि इजिप्त, कैरो त्रैमासिकातून प्रकाशित केले जाते. अशा प्रकारे दोन देशांमधील फॅशन परिस्थितीची देवाणघेवाण या मासिकातून होते असे सायरस पेस्टनजी यांनी सांगितले.

सायरस पेस्टोन्जी म्हणाले, “द निचे फॅशन एरिना इंटरनॅशनल” एक भारतीय फॅशन मासिक आहे. फॅशन समुदायासाठी १००% व्यासपीठ ज्यात फॅशन डिझायनर, फॅशन ब्लॉगर, फॅशन मॉडेल, फॅशन कोरिओग्राफर, फॅशन लेबल मालक आणि बरेच काही आहेत. ज्युरी द्वारे निवडले गेलेले सर्वोत्तम डिझाईन्स आहेत. अभिनेत्री सिमरन आहुजा यांनीही यावर सहमती दर्शवली. हे मासिक लवकरच अॅमेझॉनवर जागतिक स्तरावर वाचकांसाठी उपलब्ध होईल असे ही सायरस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!