पुणेविशेषशैक्षणिक

शाळेच्या पहिल्या दिवशी उत्कर्ष स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

गेल्या बावीस वर्षापासून काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे विद्यार्थी घडवण्यामध्ये योगदान

पुणे: शाळेच्या पहिल्याच दिवशी साजऱ्या होणाऱ्या शालेय प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने आज मंगळवार दिनांक २० जून रोजी पुणे सुखसागर नगर येथील उत्कर्ष इंग्लिश शाळांमध्ये अनुभवायला मिळालेले असे वातावरण विद्यार्थ्यांना आपणच सेलिब्रेटी असल्याचा एक अनोखा अनुभव देत होते.

शाळांच्या आवारामध्ये लावलेली कार्टून हिरोंची मोठ-मोठी कट-आउट्स….रंगबेरंगी खडूंनी रंगविलेले फळे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या तितक्याच आकर्षक रांगोळ्या… अशा सर्वच बाबींकडे अगदी नवलाईने पाहत, शाळेमध्ये ‘एन्ट्री’ घेणारे बालक- पालक आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तत्परता दाखविणारे शालेय शिक्षक मोठे उत्साही दिसत होते.

विद्यार्थ्यांच्या स्वागतामध्ये कोणतीही कसूर न ठेवता, जंगी स्वागत समारंभांचे आयोजन काकडे देशमुख एज्युकेशन सोसायटी संचालित उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने केले होते. या प्रसंगी काकडे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र काकडे, सचिव ओमकार काकडे, प्रमुख पाहुणे म्हणून आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजाभाऊ कदम, शाळेच्या सह संचालिका शांभवी ओमकार काकडे यांच्या सह सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल गेल्या 22 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले योगदान देत आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, बालाजी नगर, सुखसागर नगर, आदी सहा ठिकाणी आपल्या शाखांच्या माध्यमातून यंदा आठशे मुलांना घडविण्याचे कार्य काकडे कुटुंबीय करताना पाहायला मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!