पुणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

जय महेश मंच, पुणेच्या वतीने महेशनवमी उत्सव, ५१५५ वा माहेश्वरी वंशोत्पत्ती दिन साजरा

निस्वार्थसेवा आणि परमार्थाची भावना माहेश्वरी समाजाची खास वैशिष्ट्य; लोकसभा अध्यक्ष ओमजी बिरला

पुणे: माहेश्वरी समाजाने आपल्या कामातून देश आणि विश्वात ओळख निर्माण केली आहे. आपल्या पूर्वजांनी जे संस्कार आणि संस्कृती आपल्याला दिली तेच संस्कार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. युवक देखील विविध क्षेत्रात उन्नती करून देशाचा गौरव वाढवण्यात योगदान देत आहेत. निस्वार्थसेवा आणि परमार्थाची भावना माहेश्वरी समाजाची खास वैशिष्ट्य आहे. याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात समाजाने केलेल्या कामाबद्दल सादूवाद व्यक्त करून लोकसभेचे अध्यक्ष ओमजी बिरला यांनी माहेश्वरी वंशोत्पत्ति दिन व महेशनवमीच्या शुभेच्छा समाज बांधवांना दिल्या.

दरवर्षीप्रमाणे जय महेश मंच, पुणे यांच्या वतीने महेशनवमी उत्सव, ५१५५ वा माहेश्वरी वंशोत्पती दिन मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन असून, यशोधन सोसायटी मधील मंदिरात सकाळी बालगोपाळांच्या हस्ते महेश भगवंताचे अभिषेक, पूजन करून सुरूवात करण्यात आली. भव्य रथयात्रेत शिव-पार्वती झाकी सोबत नंदी, उंट, घोडे आदींसह म्युच्युअल बॅण्डचा समावेश होता. जय महेशाच्या गगनभेदी जयघोषाने व पारंपरिक नृत्य सादर करत मोठ्या उत्साहाने रथयात्रा काढण्यात आली.जय महेश मंच आयोजित महेशनवमी उत्सव २०२२ साळवे गार्डन, शांतीनगर जवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात बहुसंख्य कलाकारांनी सादर केलेल्या “माहेश्वरी वंशोत्पती( एक स्वर्णिम उदय)” या भव्य नाटीकाने सर्वांची मने जिंकली. जे.एम.एम इंस्पेरशनल आयकॉन पुरस्काराने सन्मान तसेच संस्कार समीक्षा स्पर्धेची पारितोषिकांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. या प्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिरला यांनी विशेष पत्रा द्वारे जय महेश मंच यांना शुभेच्छा दिल्या तसेच रूपल मेहता (मिसेस युनीवर्स), मा. आमदार योगेश टिळेकर, मनसे पुणे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या सह विविध क्षेत्रातील प्रतीष्ठीत मान्यवर, जय महेश मंचचे सर्व पदाधिकारी, सदस्य, समाजातील जेष्ठ नागरिक, बंधू-भगिनीं व लहान-थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुभेच्छा देतांना योगेश टिळेकर म्हणाले, देशाच्या विकासामध्ये माहेश्वरी समाजाचे योगदान मोलाचे आहे. आज उद्योगक्षेत्रात मोठमोठे चेहरे माहेश्वरी समाजाने दिले. आज पुणे मुंबईसह महाराष्ट्रच्या विकासात देखील या समाजाचा हातभार महत्त्वाचा आहे. असे विचार व्यक्त करत त्यांनी महेशनवमीच्या शुभेच्छा दिल्या व कोंढवा बुद्रुक परिसरात महेश भवन उभारण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!