
येरवडा: शहर व आपला परिसर स्वच्छ करून तमाम पुणेकरांना निरोगी ठेवण्यासाठी हातभार लावत असलेल्या आरोग्य व स्वच्छता कर्मचारी वर्गाचा सन्मान व महिलांना साडी तर पुरूषांना ड्रेस भेट देऊन शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख आंनद गोयल यांनी आपला वाढदिवस आज शनिवारी साजरा केला.
तसेच वाढदिवस व शिवसेना वर्धापनदिनानिमित्त येरवडा परिसरातील विविध ठीकाणी तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबीराचे देखील आयोजन गोयल यांनी केले होते. यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, मोतिबिंदू शस्त्रक्रिया नाव नोंदणी, डेन्टल, रक्त, बीपी, शुगर तपासणी आदी सम्पूर्ण आरोग्य विषयक तपासणी या शिबीर मध्ये करण्यात आली होती. तिन्ही दिवस शिबीराला उस्फूर्त प्रतीसाद देत हजारो नागरीकांनी शिबीराचा लाभ घेतला.
८० ℅ समाजकार्य २०% राजकारण अशी शिकवण देणारे स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणूकीवर चालणारे आनंद गोयल यांनी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाजातील गरजूंना हवी असलेली आरोग्य सेवेतून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मकरंद पेठकर, राजेंद्र शिंदे, अक्षय साळवे, पाला मोरे, किशोर पाटील, शांताराम खलसे, शंकर संगम, सुनील जाधव, सचीन खांदवे, सोमनाथ खांदवे, संजय भालेराव, संतोष भोसले, प्रशांत मोरे, कविता आंब्रे, शशी देवकर, दिपक, यशवंत, संतोष शेडगे, राहूल शेडगे, निखील दाभाडे, अतूल उमेश, अनवर पठाण, केवल पासळकर तसेच मित्रपरिवार, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.