पुणेविशेषशैक्षणिकसामाजिक

४०० गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

We Love you Foundation आणि प्रगती फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

कात्रज: प्रगती फाऊंडेशन कात्रज आणि we Love Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅग्स चे वाटप आज गुरूवार दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय we Love Foundation चे प्रमुख जंग-गील जा यांच्या संकल्पनेतून तसेच माजी नगरसेवक प्रकाश शेठ कदम मार्गदर्शनाखाली राजीव गांधी नगर येथील रामराज्य प्राथमिक विद्यालयातील चारशे विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप केले गेले. यामध्ये मह्त्वाचे योगदान प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक कदम, we Love Foundation चे पुणे शहराध्यक्ष अदिल डॅनियल, कुरियन अॅन्थोनी, सौ. अश्विनी परेरा, सचीन पासलकर, मुख्याध्यापक संतोष खोरे, प्रगती फाऊंडेशनचे सर्व सदस्य, we Love Foundation चे सदस्य, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रगती फाऊंडेशनचे आणि we Love Foundation हे सातत्याने समाजातील विविध घटनांच्या दृष्टीने कार्य करत असतात. यामध्ये गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना सहाय्यता, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम या फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जातात. त्याच क्रमात आज विद्यार्थ्यांना या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रकाश कदम, अदिल डॅनियल, प्रतीक कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच रामराज्य शाळेच्या वतीने या दोन्ही संस्थेचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!