जीएच रायसोनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला दहा वर्षांसाठी यूजीसीकडून स्वायत्त दर्जा प्रदान

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जी.एच. रायसोनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वाघोली, पुणे यांना दहा वर्षांसाठी स्वायत्त दर्जा दिला आहे. यूजीसी ने पुण्यातील फार कमी महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा दिला आहे, आता त्यात जी.एच. रायसोनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा समावेश झाला आहे.
कौशल्याधारित मुल्यात्मक शिक्षण आणि गुणात्मक अध्यापन पद्धती प्रदान करण्याऱ्या शिक्षण संस्थेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या, जीएच रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सने आपल्या कामगिरीसाठी विशेषाधिकार मिळवला आहे. या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) द्वारे ग्रेड ‘A’ मान्यता प्राप्त आहे.
जीएच रायसोनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. आरती देशपांडे म्हणाल्या की, आमच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाढीसाठी स्वायत्त दर्जा मिळणे महत्त्वाचे आहे. स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला अभ्यासक्रम डिझाइन करणे, विद्यार्थी मूल्यांकन प्रणाली लागू करणे आणि पदवी प्रदान करणे यासारखे अधिकार मिळाले आहे. महाविद्यालय आता आपला अभ्यासक्रम उद्योगाच्या मागण्यानुसार आणि उदयोन्मुख ट्रेंडशी अधिक जवळून घेण्याचे कार्य करेल. नवीन अभ्यासक्रम बनवणे, विद्यमान अभ्यासक्रमांची दुरुस्ती करने, आणि उद्योग भागीदारांसोबत सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेता येईल. मूल्यांकनाच्या या सुव्यवस्थित दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे, पदवीनंतर त्यांची रोजगारक्षमता वाढवणे यासाठी आम्ही नेहमी कार्य करत राहू, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जी. एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेंजमेंट पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर, म्हणाले, “यूजीसीने दिलेला स्वायत्त दर्जा हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हे आमच्या प्राध्यापकांचे समर्पण आणि आमच्या विद्यार्थ्यांची शिकण्याची बांधिलकी अधोरेखित करते. नव्याने आत्मसात केलेल्या स्वायत्तता दर्जा महाविद्यालयात संशोधन केंद्रांची स्थापना, आंतरविद्याशाखीय प्रकल्पांवरील सहयोग आणि विविध स्त्रोतांकडून संशोधन निधीचे आकर्षण निर्माण करण्यास मदत करेल.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमिता घार्गी, म्हणाले की, स्वायत्त दर्जा मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. कॉलेज प्रगती करण्यासाठी यूजीसी अधिकार्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहिल. यूजीसी ने नवीन स्वायत्तता प्रदान करताना गुणवत्ता हमी यंत्रणा कायम ठेवण्याचे आणि शैक्षणिक मानकांचे पालन करण्याच्या मुद्दावर अधिक भर दिला आहे. यासाठी संस्था म्हणून आम्ही नक्कीच कार्य करू.या यशाबद्दल जी. एच. रायसोनी ग्रुपचे अध्यक्ष सुनील रायसोनी, जी. एच. रायसोनी ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री.श्रेयेश रायसोनी यांनी जीएच रायसोनी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.