पुणेविशेषशैक्षणिक

शुन्यातून विश्व निर्माण करणार्या स्रीचे आत्मचरित्र ‘मी अंजना शिंदे’ या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन

अनेक महिलांना जगण्याची उमेद देईल असे आत्मचरित्र

Pune: शुन्यातून विश्व निर्माण करणार्या स्रीचे आत्मचरित्र ‘मी अंजना शिंदे’ या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन समारंभ आज सोमवार दिनांक ९ मे २०२२ रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे करण्यात आले. ‘मी अंजना शिंदे’ या आत्मचरित्र पुस्तकाचे शब्दांकन स्वर्गीय अंजना शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांनी केले असून आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर चे अध्यक्ष भारत सासणे, प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई चे प्राध्यापक हरी नरके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक दिलीप फलटणकर, जेष्ठ लेखक रविप्रकाश कुलकर्णी आदी मान्यवरांच्या तसेच नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यप्रेमीं उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी या आत्मचरित्राचे जिवंत वर्णन व्यक्त केली व पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक प्रत्येकाला आपल वाटेल तसेच अनेक महिलांना जगण्याची उमेद देईल अस हे आत्मचरित्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने मी अंजना शिंदे हे चरित्र वाचावे अशे आवाहन मान्यवरांनी वाचकांना केले.

भारत सासणे म्हणाले, अंजना शिंदे यांचे आत्मचरित्राचे वर्णन करताना प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रसंगात सत्य दाखवून देण्यासाठी त्या पद्धतीने शब्दांकन देखील पुस्तकात पाहायला मिळते. अंजना शिंदे जरी आज हयात नसल्या तरी या आत्मचरित्रातून त्यांचे जीवन विशाल यांनी अमर केले आहे. असे म्हणून सासणे यांनी विशाल शिंदे यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!