पुणेविशेषसामाजिक

यशस्विनी विकास प्रतिष्ठान, पुणे तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पुरस्काराचे वितरण

पुणे: समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान यशस्विनी विकास प्रतिष्ठान, पुणे नेहमीच करत असते. गेल्या दोन वर्षांपासून जगावर आलेल्या कोरोना रूपी संकटाचा सामना सर्वांनी केला. किंतु या काळात स्वतःचा बचाव करत इतरांसाठी जोखीम घेऊन काम केलेल्या योद्धांचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यस्तरीय गौरव रत्न पुरस्कार २०२१ चे आयोजन यशस्विनी विकास प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर पुरस्काराचे वितरण रविवार दि ३१ ऑक्टोबर २०२१ दुपारी १२वा. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ सुनिता डांगे यांनी दिली.

यांदाच्या पुरस्काराचे मानकरी-
विवेक माळवदे (उद्योजक), गोरक्षनाथ घाडगे (युवा पुरस्कार), सुनिता दातार (शिक्षिका), श्रीकृष्ण सावंत (समाजसेवक), निलेश गिरिमे (समाजसेवक), कु.कृपा वाघचौरे (बालकलाकार), विठ्ठल तांबे (पत्रकार), अनिता घारमरकर (व्यावसायिक), संतोष डिंबळे सर पाटील (समाजसेवक), जयक्षी देशपांडे (शिक्षिका), सुमीत अंबेकर (युवा पत्रकार), मीलळ सोनवणे (वैद्यकीय), ज्ञानेश्वर दळवी (समाजसेवक), रुबिना जमदार (क्रीडा), अमित शर्मा (प्रसार वाहिनी), रश्मी सोरटे (व्यवसायीक), सविता तरडे(समाजसेविका), डाॅ. प्राजक्ता सराफ(वैद्यकीय), रामदास चव्हाण (कृषी), सोमनाथ मोरे(सामाजिक), अमृता गंगावणे (नृत्य), हर्षदा पाटील (पर्यावरण), बाळकृष्ण डावखर(समाजसेवक), शशिकला पाटील (शिक्षण), कु. साक्षी डांगे, जानशिन अग्रीशिखी जावळीकर, इत्यादी.

५ नोव्हेंबर २०१५ साली स्थापन झालेले यशस्विनी विकास प्रतिष्ठान, गेल्या पाच वर्षांपासून पुण्यातील विविध भागात शकडो समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करत आले आहे. प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. सुनिता डांगे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना आपातकालीन परिस्थितीत हजारो नागरिकांना मदत, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन, मोठ्या प्रमाणात लसीकरण, पूरग्रस्तांना मदत, महिला सबलीकरणासाठी व्यवसायीक मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी अनेक कामाच्या माध्यमातून जनतेची सेवा प्रतिष्ठान करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!