
Pune: नऱ्हे, आंबेगाव जांभुळवाडी, सिंहगड रोड परिसरातील खवय्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे मिसळ प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी राव मिसळ आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. सौ. अंजना नारायण जगताप, मंगेश नारायण जगताप व जय नारायण जगताप यांनी सुरू केलेल्या राव मिसळचा आज गुरुवार दिनांक २५ मे रोजी उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
ओबीसी आघाडीचे अतुलशेठ चाकणकर व समाजसेविका सौ. माधुरी शिवाजी चाकणकर यांच्या हस्ते फीत कापून तर देव पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाथ म्हसोबा साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय चाकणकर, शिवाजीराव चाकणकर, सतिषशेट चाकणकर, जिजाताई चाकणकर, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस सावंत सर, उपसरपंच सागर भूमकर, अरविंद भोरे, शालिनी कडू आदी विविध क्षेत्रातील मान्यवर सोबतच मिसळप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
राव मिसळ मध्ये वाढदिवस, एनिवर्सरी सेलिब्रेशन साठी विशेष व्यवस्था उपलब्ध असून २७ मे पर्यंत अनलिमिटेड मिसळ, आमरस फक्त ९९ रुपयात तेही एकावर एक फ्री ठेवण्यात आली आहे. मिसळ सोबतच खेड शिवापूरची स्पेशल मटकी भेळ, ओळी भेळ, कट भेळ, स्पेशल चहा व नाष्टा देखील ग्राहकांना अनुभवता येणार आहे.
त्यामुळे त्यारा करा आणि आजच शॉप नंबर २, चाकणकर प्रॉपर्टीज, नाऱ्हे सेल्फी पॉईंट जवळ सर्विस रोड, नाऱ्हे येथील राव मिसळला भेट द्या.