पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने अभिवादन

महापुरुषांची जयंती फक्त फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी साजरी करू नका; बाप्पूसाहेब भोसले यांचे प्रतिपादन

पुणे: महापुरुषांची जयंती फक्त फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी साजरी न करता त्यांनी दिलेले विचार व संदेश घरातील प्रत्येकाच्या मनात पेरले गेले पाहिजे. आज जयंती निमित्त संकल्प करूया की, प्रत्येक स्त्री चा आदर मी करील, मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वाभिमानी बनण्याची गरज आहे. याची सुरुवात स्व:ताच्या घरापासून करून गल्ली, शहर, राज्य नंतर देश पातळीवर पोहचवला वेळ लागणार नाही. अशा भावना बाप्पूसाहेब भोसले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना व्यक्त केल्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने महात्मा फुले वाडा समता भुमी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख यांनी माता सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतांना फुले दाम्पत्याचा जयघोष केला व उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

अभिवादनाप्रसंगी संघराज गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष, महादेव गायकवाड पुणे शहर अध्यक्ष, शाहरुख पठाण, शशिकांत नाईक, सागर भालेराव, शाकीर शेख, रहिमान शेख, वाजिद सय्यद, विकी गालटे,सोनु सय्यद आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!