आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेष

जीविका हेल्‍थकेअरने भारतातील लसीकरणामधील तफावत दूर करण्‍यासाठी सुरू केली जीविका संपूर्ण टीकाकरण योजना

पुणे : जीविका हेल्‍थकेअर या तळागाळाच्‍या स्‍तरावर परवडणारी, उपलब्‍ध होण्‍याजोगी व समान आरोग्‍यसेवा सिस्‍टम्‍स निर्माण करण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या सामाजिक उद्योगाने आज त्‍यांचा नवीन उपक्रम ‘जीविका संपूर्ण टीकाकरण योजना (जेएसटीवाय)’च्‍या शुभारंभाची घोषणा जीविका हेल्थकेअर चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, जीविका हेल्थकेअरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य. डॉ. राज शंकर घोष, जीविका हेल्थकेअरचे सह-संस्थापक आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कृणाल मेहता आणि अभिनेत्री अलका कुबल याच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी क्सीनऑनव्हील्स चे वरिष्ठ व्यवस्थापक अंकित सिंग सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हा उपक्रम सरकारी लसीकरण उपक्रमांतर्गत नसलेल्‍या लसींना अत्‍यंत किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध करून देत मुलांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण होण्‍याची खात्री घेतो. हा अग्रगण्‍य प्रकल्‍प टायफॉइड, हिपॅटायटीस-ए, इन्फ्लूएन्झा, मेनिन्गोकोकल आणि चिकन पॉक्स या पाच लस-प्रतिबंधक आजारांविरुद्ध ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना महत्त्वाच्या लस देण्यावर लक्ष केंद्रित करेल. जीविका संपूर्ण टीकाकरण योजना (जेएसटीवाय)चे सादरीकरण सामुदायिक पातळीवर या आजारांविरोधात लढण्‍यामधील प्रमुख पुढाकार असेल. ही योजना मुलांचे जीवन व भविष्‍याचे संरक्षण करण्‍यास मदत करते, परिणामत: त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक विकासामध्‍ये अडथळे निर्माण करणारे गंभीर धोके कमी होतील.

या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून जीविका हेल्‍थकेअर सरकारच्‍या लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्‍याप्रती समर्पित असलेली अद्वितीय खाजगी हेल्‍थकेअर सेवा प्रदाता आहे. या उपक्रमाद्वारे पालक प्रथम मोफत सरकारी लसीकरणांना प्राधान्‍य देत असल्‍याची आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या मुलांची जेएसटीवायसाठी नोंदणी करत सरकारी केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध नसलेल्‍या या अतिरिक्‍त लसींचा फायदा घेत असल्‍याची खात्री घेण्‍यात येईल. या उपक्रमाचा एकूण लसीकरणाचे प्रमाण वाढवण्‍याचा, तसेच व्‍याजमुक्‍त मासिक हप्‍त्‍यांच्‍या माध्‍यमातून अत्‍यावश्‍यक आर्थिक साह्य प्रदान करण्‍याचा उद्देश आहे. हा उपक्रम महाराष्‍ट्रातील पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपासून सुरू होईल, जो व्‍यापक लसीकरण उपलब्‍धतेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने जीविका हेल्‍थकेअरचा पहिला पुढाकार असेल.

महाराष्‍ट्रातील सर्वात मोठी खाजगी लसीकरण साखळी जीविका हेल्‍थकेअरने पुण्‍यामध्‍ये १०० लसीकरण क्लिनिक्‍स लॉन्‍च केले आहेत, ज्‍यामुळे कुटुंबांना व समुदायांना सुलभपणे लसीकरण उपलब्‍ध झाले आहे. विचारशील विस्‍तारीकरण योजनेला पुढे घेऊन जात हा उपक्रम राज्‍यातील इतर प्रदेशांमध्‍ये, तसेच देशभरात विस्‍तारित होण्‍यास सज्‍ज आहे. जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेच्या मिशनवर अधिक भर देत मराठी चित्रपटसृष्‍टीतील दिग्‍गज अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी मोहिमेचा चेहरा व आवाज म्‍हणून सहयोग केला आहे. एक प्रभावक म्‍हणून त्‍यांचे समर्थन लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण संदेशाचा प्रसार करतो, ज्‍यामधून कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही याप्रती कंपनीची अविरत कटिबद्धता दिसून येते.

या थोर कार्याप्रती आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत अलका कुबल म्‍हणाल्‍या, ”मला जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेचा भाग असण्‍याने सन्‍माननीय वाटत आहे. जीवनदायी लसीकरण हे प्रत्‍येक मुलाचा अधिकार आहे आणि त्‍यांना प्रतिबंधात्‍मक आजारांविरोधात लसीकरणाच्‍या माध्‍यमातून योग्‍य संरक्षण मिळण्‍याची खात्री घेणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे. मी देशाच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये या संदेशाचा प्रसार करण्‍यासाठी माझा पाठिंबा व योगदान देण्‍याचा निर्धार केला आहे.”

”जीविका संपूर्ण टीकाकरण योजना ही आपले सर्वाधिक दुर्लक्ष होणाऱ्या मुलांच्‍या आरोग्‍याला उत्तम करण्‍याप्रती सरकारच्‍या प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता आहे,” असे जीविका हेल्‍थकेअरचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जिग्‍नेश पटेल म्‍हणाले.

ते पुढे म्‍हणाले, ”भारत सरकारचा युनिव्‍हर्सल इम्‍यूनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) सर्व नागरिकांना आवश्‍यक लस देण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिला आहे. पण, अजूनही काही आजारांवर प्रतिबंध ठेवता आलेले नाही, ज्‍यामुळे तान्ही बालके व मुलांच्‍या आरोग्‍याला संभाव्‍य धोके आहेत. जीएसटीवाय अंतर्गत आमचा सेवा उपक्रम यूआयपीअंतर्गत लसीकरण न मिळालेल्‍या मुलांना अतिरिक्‍त लस देत ही तफावत दूर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. श्रीमती अल्‍का कुबल यांच्‍या पाठिंब्‍यासह आम्‍हाला प्रबळ समर्थन मिळाले आहे. त्‍यांच्‍यासोबत सहयोगाने आणि आमच्‍या संयुक्‍त प्रयत्‍नांसह आम्‍ही अशा समाजाची निर्मिती करू, जेथे एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्‍येक मुलाला उत्तम पोषण व संगोपन मिळण्‍याची खात्री घेतली जाईल.”

जीविका हेल्‍थकेअरच्‍या जेएसटीवाय उपक्रमाने वंचित समुदायांना अतिरिक्‍त लसीकरण सुविधा देण्‍यासाठी स्‍थानिक प्रॅक्टिशनर्ससोबत सहयोग केला आहे. हा उपक्रम मुलांसाठी आजारांना प्रतिबंध करणाऱ्या वातावरणाची निर्मिती करतो आणि सध्‍या पुण्‍यातील पीसीएमसी क्षेत्रात कार्यरत आहे. सुलभ उपलब्‍धतेसाठी जनतेकरिता हॉटलाइन क्रमांक ९५०३० ४७८६० उपलब्‍ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!