श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२२ च्या पुणे विभागाचा निकाल जाहीर
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२२ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने द्वितीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने चौथे तर भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५२ मंडळांपैकी १०४ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ३१ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त विजयकुमार वांबुरे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, कोषाध्यक्ष यतिश रासने, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील पोलीस आयुक्त रितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या बिरसा मुंडा क्रांतीकारक सजीव देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या शालेय साहित्यापासून गणेश मूर्तीची स्थापना या देखाव्यास ४५ हजारांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या माणुसकी हाच धर्म या सजीव देखाव्यास ४० हजारांचे, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टच्या पावनखिंड लढा या सजीव देखाव्याला ३५ हजारांचे आणि शिवाजी मित्र मंडळाच्या काकोरी कांड या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला देण्यात येणार आहे. रुपये १ लाख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात मकरंद रानडे, डॉ. अ.ल.देशमुख, पराग ठाकूर, विजय चव्हाण, सुरेश वरगंटीवार, मधुकर जिनगरे, सतिश मराठे, किशोर सरपोतदार, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर यांसह सहाय्यक म्हणून अश्विन पडवळ, श्रीपाद एडके, अनिरुद्ध दोरगे, निखील कांबळे, गौरव दरेकर, ओम खवले, श्री धरमकारे यांनी काम पाहिले.
इतर निकाल :-
१) पश्चिम विभाग :- संगम तरुण मंडळ (प्रथम), विनायक नवयुग मित्र मंडळ (द्वितीय), श्रीमंत आझाद मित्र मंडळ (तृतीय),
काल्पनिक देखावे – त्रिदल गणेश मंडळ ट्रस्ट कोथरुड. सजीव देखावे – संयुक्त आझादनगर मंडळ (प्रथम), एकी तरुण मंडळ
(द्वितीय), समाजसुधारक हिंदुस्थानी मित्र मंडळ ट्रस्ट, अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (तृतीय – विभागून) धार्मिक व पौराणिक देखावे – परोपकार मित्र मंडळ (प्रथम), आनंदनगर पार्क मित्र मंडळ (द्वितीय), श्रीकृष्ण मित्र मंडळ डेक्कन, तानाजी तरुण मंडळ (तृतीय – विभागून). सामाजिक कार्य – भैरवनाथ मित्र मंडळ औंध गाव (प्रथम), नवजवान मित्र मंडळ कोथरुड
(द्वितीय), बाल तरुण मंडळ (तृतीय). ऐतिहासिक – आराधना स्पोटर्स क्लब ट्रस्ट, पांडवनगर.
२) पूर्व विभाग :- अखिल गणेशबाग मित्र मंडळ (प्रथम), नवरंग मित्र मंडळ (द्वितीय), जय जवान मित्र मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे – अमर मित्र मंडळ (प्रथम), नवयुग मित्र मंडळ (द्वितीय). ऐतिहासिक – हनुमान मित्र मंडळ वानवडी.
३) उत्तर विभाग :- नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट (प्रथम), श्री अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय), दर्शक तरुण मंडळ येरवडा (तृतीय), सजीव देखावे – दि नॅशनल यंग क्लब खडकी (प्रथम), गवळीवाडा तरुण मंडळ खडकी बाजार (द्वितीय), विकास तरुण मंडळ (तृतीय), सामाजिक देखावे – आदर्श तरुण मंडळ (प्रथम), जनतानगर मित्र मंडळ (द्वितीय).
४) दक्षिण विभाग :- उदय मित्र मंडळ (प्रथम), हनुमान आझाद मंडळ ट्रस्ट (द्वितीय), उंब-या गणपती मित्र मंडळ धायरी (तृतीय). सामाजिक देखावे – कै.मिनू मेहता सहकारी मित्र मंडळ (प्रथम), साई मित्र मंडळ आंबेगाव पठार (द्वितीय), जय महाराष्ट्र मित्र मम्डळ धनकवडी (तृतीय). काल्पनिक देखावे – अखिल लक्ष्मीनगर रहिवासी संघ (प्रथम), पंचरत्नेश्वर मित्र मंडळ ट्रस्ट (द्वितीय), एकता
मित्र मंडळ ट्रस्ट अरण्येश्वर (तृतीय).
५) मध्य (उत्तर) विभाग :- अष्टविनायक मित्र मंडळ (प्रथम), शनिवार मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय), श्री सुंदर गणपती मित्र मंडळ (तृतीय). सामाजिक देखावे – श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट (प्रथम), व्यवहार आळी मित्र मंडळ चौक (द्वितीय), श्री संभाजी मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे – गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ (प्रथम), जय जवान समता मित्र मंडळ
(द्वितीय), विधायक मित्र मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे – श्री गजानन मित्र मंडळ (प्रथम), शिवांजली मंडळ (द्वितीय),
पद्मशाली सम्राट मित्र मंडळ (तृतीय). ऐतिहासिक देखावे – फणी आळी तालीम ट्रस्ट (प्रथम), नव भारत सेवक मंडळ (द्वितीय).
६) मध्य (दक्षिण) विभाग :- वीर शिवराज मित्र मंडळ (प्रथम), अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय),
अकरा मारुती कोपरा मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे – वीर हनुमान तरुण मंडळ (प्रथम), होनाजी तरुण मंडळ (द्वितीय), ओम हरिहरेश्वर मित्र मंडळ (तृतीय). उत्तेजनार्थ – शिवतेज मित्र मंडळ (प्रथम). सामाजिक – हिंद माता तरुण मंडळ (प्रथम), अनंत
मित्र मंडळ (द्वितीय), श्री शिवाजी चौक मित्र मंडळ (तृतीय). धार्मिक/पौराणिक देखावे – गणेश मित्र मंडळ चिंचेची तालीम.
७) श्री गणेशोत्सव विशेष पारितोषिक :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट, आदर्श मित्र मंडळ (जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे).
८) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ पुणे विद्यापीठ, १५ आॅगस्ट चौक मित्र मंडळ (७५ वर्षे), जय जवान मित्र मंडळ, अखिल नाना पेठ समझोता मित्र मंडळ (५० वर्षे), विनायक मित्र मंडळ, मौर्य गार्डन मित्र मंडळ (२५ वर्षे)
९) शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणारी मंडळे :- श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, साईनाथ मित्र मंडळ आनंदनगर.
१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- न्यू इंग्लिश कूल रमणबाग (प्रथम), नवीन मराठी शाळा (द्वितीय), मूक बधीर शिक्षण विभाग आपटे विद्यालय परिसर (तृतीय), गोळवलकर माध्यमिक विद्यालय, सुंदराबाई राठी हायस्कूल, वा.रा.घोलप विद्यालय,
अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय (उत्तेजनार्थ).
११) सांस्कृतिक कार्य मंडळे :- श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट (प्रथम), लोकमान्य टिळक प्रस्थापित प्रथम गणपती ट्रस्ट
(द्वितीय), अमर मित्र मंडळ (तृतीय)
१२) वैज्ञानिक देखावे :- शिवराज मित्र मंडळ (प्रथम), नवभारत मित्र मंडळ (द्वितीय), बाल मित्र मंडळ – अथर्व बाल मित्र मंडळ,
श्रीराम बाल मित्र मंडळ
१३) सोसायटी :- श्री गणेश मित्र मंडळ घोले रोड (प्रथम), स्वस्तिश्री गृ. रचना संस्था गणेशनगर (द्वितीय), सदाशिव सह गृ.र.संस्था आणि सरीता विहार गृ.र. संस्था सिंहगड रस्ता (तृतीय – विभागून), शिवालय गृ.र.सं.मर्या., बी.यू.भंडारी गृ.र.संस्था (उत्तेजनार्थ)
यंदा दगडूशेठ गणपती दुपारी ४ वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार
मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागीलवर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.