सर्वात मोठा ग्लोब-टेक इंजिनिअरींग एक्स्पो आता पुण्यात; नवीनतम उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि ट्रेंडचे प्रदर्शन
गुरुवार, २५ मे ते २८ मे २०२३, ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड

पुण्यात अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्राशी संबंधित ग्लोब-टेक इंजिनिअरींग एक्स्पो या बहुप्रतिक्षित प्रदर्शनाचे आयोजन २५ मे ते २८ मे २०२३ या कालावधीत केले जाणार आहे. हा एक्स्पो पिंपरी-चिंचवड मधील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केला गेला आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि गतिमान व्यापारीसंस्था एकत्र येणार आहेत. उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि या क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड आणि तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी एक अनोखी संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
इंजिनिअरींग मशिनरी, मशीन टूल्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल्स, इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल हँडलिंग उपकरणे, लेझर टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि पॉवर-एनर्जी सोल्यूशन्स अशा विस्तीर्ण श्रेणींमधील उत्पादनांचा समावेश असलेले ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पो हे उत्पादक आणि ग्राहकांना एकमेकांशी संबंध जोडण्याची आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील नवीनतम घडामोडी जाणून घेण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. या एक्स्पोला पिंपरी-चिंचवड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन आणि इतर अनेकांनी या प्रदर्शनाला पाठींबा दर्शविला आहे.
या कार्यक्रमाविषयी बोलताना, ग्लोब-टेक मीडिया सोल्युशन्सचे संचालक, श्री. सतीश मांडोळे म्हणाले: “भारतातील सर्वात उत्साही आणि गतिमान शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पो आणतांना आम्हाला आनंद होत आहे. नवोन्मेष आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेने समृद्ध असलेले पुणे हे या कार्यक्रमासाठी योग्य ठिकाण आहे. आम्हाला खात्री आहे की या वर्षीचे प्रदर्शन हे सर्वोत्तम असेल. आम्ही देशभरातील आणि बाहेरील प्रदर्शकांचे आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या एक्स्पोला उत्तम यश मिळेल.”
या कार्यक्रमाला देशभरातून आणि इतर देशातून १५,०००हून अधिक व्यावसायिक उद्योजकप्रेमी येतील अशी अपेक्षा आहे. १२०हून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह, हा एक्स्पो हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्स्पो ठरणार आहे. जयश्री मशीन टूल्स, विला सीएनसी इंडिया, सिंकॅक्सिस, क्लोस वेल्डिंग (जर्मन), सहजानंद लेझर टेक्नॉलॉजी, ईएलजीआय आणि हनीवेल इ. या प्रदर्शनाचे काही प्रदर्शक आहेत. भारताच्या इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या (EEPC) मते, भारताची २०२०-२१मधील अभियांत्रिकी निर्यात ७२.५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ११.७% अधिक आहे. अभियांत्रिकी उद्योगाचे यात मोठे योगदान आहे.
या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत सातत्यपूर्ण वाढ झाली असून ६.९%च्या वार्षिक चक्रवाढ दराने (CAGR) निर्यात वाढत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे भारतातील अभियांत्रिकी आणि उत्पादनक्षेत्र संबंधित उत्पादनांची मागणी वाढली आहे. अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगातील आघाडीची व्यावसायिक संघटना असलेल्या ग्लोब-टेक मीडिया सोल्युशन्सने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यशस्वीरित्या असे प्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे.
उद्योजकप्रेमीना गुंतवून ठेवतील आणि त्यांच्या ज्ञानात भर घालतील असे अनेक नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविणारा हा एक्स्पो यावर्षीचा सगळ्यात मोठा आणि रोमांचक एक्स्पो ठरणार आहे. ग्लोब-टेक इंजिनिअरिंग एक्स्पो उद्योगासाठी एक गेम-चेंजर ठरणार आहे, जो नवीन व्यवसाय संधी प्रदान करेल आणि या क्षेत्राला पुढे नेण्यात मदत करेल.