
मालेगाव: गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन (मुळशी) तर्फे मुळशी तालुक्यातील माले गावातील सेनापती बापट माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता ५ वी ते १० वी च्या आदिवासी कातकरी आणि इतर गरीब कुटुंबातील ११० कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आदिवासी कातकरी समाजातील मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन गेले १० वर्ष कार्यरत आहे. यामध्ये आदिवासी कातकरी समाजासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम संस्थेकडून राबवले जातात.

या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक श्री. विनोद दातीर पाटील आणि अध्यक्षा सौ. शारदा विनोद दातीर पाटील यांनी केले होते. सदर शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास उद्योजक शरद शेंडे, निलेश शेंडे (वरिष्ट संपादक, सकाळ), शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पळसकर इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
उपक्रमासाठी शरद शेंडे, सूर्यकांत वाघ, नीना तांबे, कृत्तिका डहाळे, सोनू जोशी, रेखा कांबळे, मनिषा समर्थ, स्मिता पाटणे, माया जांगडा, सारिका शिंदे, अमृता सुर्वे, समीर गायकवाड, सुपेकर, मीना वाघ आदींचे विशेष सहकार्य लाभले होते.

कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. शारदा विनोद दातीर पाटील यांनी आदिवासी (कातकरी) समाजाचे सर्वांगीण विकासाचे व्रत हाती घेतले असून त्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.