Uncategorized

चैत्र नवरात्री निमित्त राजस्थामधील “४० कुलदेवी दर्शन महाकुंभ”

पुणे: चैत्र नवरात्री निम्मित पुण्यातील असंख्य राजस्थान येथिल कुलदेवी भक्तांसाठी जय महेश मंच, पूणे यांच्या पुढाकाराने “कुलदेवी दर्शन महाकुंभ” चे आयोजन केले होते. २४,२५ व २६ मार्च रोजी तीन दिवसीय हा दर्शन सोहळा; साळवे गार्डन, गंगाधाम- इस्कॉन मंदिर रोड, पुणे येथे संपन्न झाला.सदर दर्शन महाकुंभात राजस्थान येथील विविध क्षेत्रातील साधारण ४० कुलदेवींच्या प्रतिमुर्तीं दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त विधिपूर्वक प्रतिमा पूजन करून कलश स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी होम हवन, भजन, आरती, तर अंतिम दिवशी २०० बालकांच्या हस्ते सरस्वती पूजन, यज्ञ- आहुती तसेच कन्या पूजन या सह प्रसाद वितरण देखील करण्यात आले.

कुलदेवींच्या दर्शनासाठी पुणे शहर आणि आसपास च्या परिसरातील विविध मान्यवरांसह हजारों भक्तांनी उपस्थित राहून लाभ घेतला.

“कुलदेवी दर्शन महाकुंभ” उपक्रमासाठी जय महेश मंच कार्यकारणी, दर्शन समिती, उस्फुर्त स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या देवी भक्तांचे सहकार्य लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!