Uncategorized

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पुण्यातील सिंहगड रोड येथे नवीन शोरूम

पुणे, २८ मार्च २०२५: विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील विठ्ठलवाडी येथील सिंहगड रोडवरील त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली. ६,८२३ चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाइन आणि शैलीतील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे. हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कारागिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात आपला ठसा वाढवण्याच्या मलाबार ब्रॅण्डच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे.

हे शोरूम ब्रँडचे भारतातील पश्चिम प्रदेशातील ४४ वे आउटलेट आहे, जे या प्रदेशात त्याची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत करते. नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री भीमराव (अण्णा) धोंडिबा तापकीर, व्यवस्थापन पथकाचे सदस्य, मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

भारत, आखाती देश, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह १३ देशांमध्ये ३९० हून अधिक शोरूम्ससह, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स त्याच्या विस्तृत संग्रह, अपवादात्मक गुणवत्ता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहे. आपली उपस्थिती आणखी मजबूत करत, ब्रँड विद्यमान मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात १२ नवीन शोरूम उघडण्यास सज्ज आहे, ज्यामुळे प्रीमियम दागिने अधिक सुलभ बनवण्याची त्याची वचनबद्धता आणखी दृढ होईल. २६ देशांमधील २२,००० बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित टीमच्या पाठिंब्याने, ब्रँडने जगभरातील १.५ कोटींहून अधिक समाधानी ग्राहकांना सेवा दिली आहे.

नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाइन केलेले सोने, हिरे, प्लॅटिनम, रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. . भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपारिक डिझाइनपासून ते आधुनिक साजशृंगारासाठी समकालीन शैलींपर्यंत, विविध पसंतीक्रमांना हे शोरूम पूर्ण करते.

या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधून दिलेल्या निवेदनात, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “पुण्यात आमचे शोरूम उद्घाटन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे शहर त्याच्या समृद्ध इतिहास, गतिमान संस्कृती आणि आधुनिक वृत्तीसाठी ओळखले जाते. मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये, आम्ही कालातीत सौंदर्य आणि अपवादात्मक कारागिरीचा मिलाफ असलेले दागिने देण्यासाठी समर्पित आहोत. गुणवत्ता, सचोटी आणि ग्राहकांच्या समाधानावर भर देऊन, आम्ही आमचे सर्वोत्तम संग्रह पुण्यात आणण्यास आणि येथील उत्साही समुदायाला एक अविस्मरणीय खरेदी अनुभव प्रदान करण्यास उत्सुक आहोत.

”ग्राहकांना परिपूर्ण दागिने निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शोरूमची रचना उत्कृष्ट प्रदर्शन सज्जे आणि उच्च प्रशिक्षित संघासह एक परिपूर्ण खरेदी अनुभव प्रदान करण्यासाठी केली आहे. या ऐसपैस जागेचे उद्दिष्ट ग्राहकांना प्रशस्त आतील भाग आणि भरपूर वाहनतळ सुविधेसह एक अद्वितीय दागिने खरेदी अनुभव प्रदान करणे हे आहे.हे शोरूमचे अनावरण जगातील सर्वात पसंतीचे ज्वेलर्स बनण्याच्या, पारंपारिक कारागिरीला आधुनिक नवोपक्रमाशी एकजीव करण्याच्या, तसेच शाश्वतता आणि सामाजिक कल्याणाला प्राधान्य देत कालातीत नमुने तयार करण्याच्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या दृष्टिकोनाला उजाळा देणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!