Uncategorized

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल तारांगणाचे अनावरण

पुणे (निगडी ): भारतातील अग्रगण्य K12 शाळा शृंखलांपैकी एक, ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या निगडी शाखेत नुकतेच एका ‘मोबाइल तारांगण’चे अनावरण करण्यात आले. त्याचे अनावरण प्रमुख पाहुणे श्री.संजय नाईकडे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग – PCMC यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाळा खगोलशास्त्र आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमावर आपले लक्ष केंद्रित करणार असून, आगामी शैक्षणिक वर्षात त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये अनुभवात्मक शिक्षण आणणार आहे. अनुभवी खगोलशास्त्रज्ञ आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या केंद्रीय खगोलशास्त्र संघाने खगोलशास्त्राचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला आहे. अभ्यासक्रमात सैद्धांतिक आणि निरीक्षणात्मक खगोलशास्त्र या दोन्हींवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्ञान आणि क्षमतांच्या विकासासाठी पोषक वातावरण पुरवले जाते.

मोबाईल तारांगणांमध्ये शो स्थापित करणे आणि चालवणे याचा उद्देश खगोलशास्त्र विषय परस्परसंवादी पद्धतीने समजून घेणे हा आहे. विद्यार्थी उपग्रह, ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू, बिग बँग थिअरी आणि सौर यंत्रणा यासारखे कार्यक्रम पाहतील. हे केवळ पाठ्यपुस्तके वाचण्यापेक्षा खगोलशास्त्र शिकणे अधिक मनोरंजक बनवेल. ऑर्किड्समध्ये खगोलशास्त्र क्लबला ‘अॅस्टोव्हर्स’ म्हणतात – हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना खगोलशास्त्र अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार्‍या गोष्टींव्यतिरिक्त खगोलशास्त्र अधिक विस्तृतपणे शिकण्यात रस आहे.

या क्लबचा उद्देश खगोलशास्त्रातील बर्‍याच व्यावहारिक बाबी, जसे की दुर्बिणी हाताळणे आणि आवकाश निरीक्षण, याचा विद्यार्थ्यांना अनुभव मिळणे हा आहे. खगोलशास्त्र क्लबचा एक पैलू म्हणजे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील क्विझ आणि ऑलिम्पियाडसाठी तयार करणे. एका शैक्षणिक सत्रामध्ये AV सत्रे, प्रात्यक्षिके, गृह-आधारित क्रियाकलाप, प्रकल्प, चर्चा, खेळ, प्रशिक्षण आणि स्पर्धा यासह २० तासांचा क्लब सहभाग अंतर्भूत असतो. शाळेने नुकतीच ज्युनियर आईन्स्टाईन स्पर्धा आयोजित केली होती, ज्याचा उद्देश अनुप्रयोग-आधारित शिक्षणाला चालना देणे आणि सर्व शाखांमधील नवोदित शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणे हा होता.

स्पर्धेतील विजेते संघ निगडी शाखेतील होते, ज्यांनी पोर्टेबल सोलर वॉटर डिसॅलिनेटर मॉडेल डिझाइन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले प्रकल्प प्रमुख पाहुण्यांसमोर दाखवून त्यांचे कौतुक मिळवले. हा कार्यक्रम तरुण मनांसाठी त्यांची प्रतिभा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड दाखवण्यासाठी एक योग्य व्यासपीठ ठरले.

याविषयी बोलताना, श्री संजय नाईकडे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग -PCMC म्हणाले की, “ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलमधील अभ्यासक्रम डिझाइन टीम आणि शिक्षकांनी अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांवर इतका भर देण्याचा हा एक अप्रतिम प्रयत्न होता. शाळेतील खगोलशास्त्र आणि रोबोटिक्स कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार करण्याच्या क्षमतेला चालना देऊ शकतात आणि तारांगण सत्रांमधून दृश्य अनुभव मिळवून आणि तारा पाहण्याच्या सहलींद्वारे, हँड्सऑन लर्निंगद्वारे वैज्ञानिक नियमांविषयी त्यांची समज सुधारू शकतात.

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, निगडीच्या मुख्याध्यापिका रोमिता शर्मा म्हणाल्या, “ऑर्किड्समध्ये आम्ही नेहमीच व्यावहारिक पद्धतीने शिकवण्याचा आणि अनुभवात्मक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. पालकांव्यतिरिक्त, विद्यार्थी देखील अनोख्या शिक्षणाचा अनुभव शोधत आहेत. म्हणून आम्ही या शैक्षणिक वर्षासाठी विशेष खगोलशास्त्र अभ्यासक्रमाची रचना आणि लाँच करण्याचे ठरवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारीक शिक्षण मिळेल. मोबाइल तारांगण सेट-अप त्या दिशेने केले जाते. खगोलशास्त्र आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमाद्वारे आमच्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढवणे हे आमचे लक्ष आहे. हे देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या उद्दिष्टाशी सुसंगत असेल. आम्हाला खात्री आहे की आमचे हुशार विद्यार्थी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील आणि शाळेला सन्मान मिळवून देतील.”

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल विषयी ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल ही भारतातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय K12 शाळांपैकी एक असुन २००२ मध्ये हैदराबादमधील तिच्या पहिल्या शाखेपासुन तिचा प्रवास सुरू झाला. दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत, मुंबई, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, गुडगाव, चेन्नई, कोलकाता, नागपूर, नाशिक, इंदूर, औरंगाबाद या २५ मोठ्या शहरांमध्ये पसरलेल्या ९० शाखांमध्ये तीचा विस्तार झाला आहे. आधुनिक भौतिक पायाभूत सुविधा, वैयक्तिक लक्ष आणि काळजीपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम सर्व OIS शाळांमध्ये एकसमानता दर्शवतो. OIS शैक्षणिक प्रगतीसह व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींनी अंतर्भूत असलेल्या CBSE आणि ICSE अभ्यासक्रमाचे अनुसरण करते. सध्या, इथे ७५०००+ विद्यार्थी आणि ७०००+ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!