पुणे,कोंढवा: नागरिक अधिकार मंचाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते समीर शफी पठाण यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी नागरिक अधिकार मंचाच्या तसेच समीर पठाण मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी समीर पठाण यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कोंढवा परिसरातील अनेक सोसायटीचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, प्रभागातील महिला, पुरुषवर्ग, जेष्ठ नागरिक तसेच बाल गोपाळ, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समीर पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून कोंढवा परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांनी नागरिकांच्या हक्कांसाठी शेकडो वेळा रस्त्यावर उतरून मोर्चे, आंदोलने, आयुक्तांना निवेदने देण्याचे काम केले. गोरगरिबांना मदतीचा हात, विद्यार्थांना शाळोपयोगी वस्तूंचे वाटप, कोरोना काळात हजारो कुटुंबांना अन्नधान्य वाटप, बेघर व इतर गरजूंना दोन वेळेचे जेवण, सोसायटी मध्ये औषध फवारणी, मास्क व सॅनिटाइजर चे वाटप, रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका, घरपोच औषधी असे अनेक सेवा त्यांनी केली. समाजातील प्रत्येक धर्माचा सन्मान करत सर्व धर्मांचे धार्मिक सण साजरे करणे समीर पठाण यांचा गुणधर्म आहे. तसेच नागरिक अधिकार मंचाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील कतृत्ववान व्यक्तींना गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यासाठी पुढाकार देखील पठाण यांनी अनेक वेळा घेतला.
वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी समीर पठाण यांनी भावना व्यक्त करतांना कोंढवा परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नासाठी तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहिल असा संकल्प केला व आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.