पुणे: द हिंदू फाउंडेशनचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष, प्रवक्ते धनंजय विष्णू जाधव, व फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा जयश्री धनंजय जाधव यांच्या आयोजनातून, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पी पी सी आर यांच्या सहकार्याने मोफत कोविशील्ड लस महाअभियानाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
अंबिल ओढा कॉलनी, साने गुरुजी नगर पुणे येथील रायगडचे सर्जेराव साळवे मनपा विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण अभियानाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंहगड भागाचे संचालक महादेव लेले, कार्यवाहक मंगेश पाटिल यांच्या हस्ते तर जिवीका हेल्थ फाऊंडेशनचे डॉ. विक्रम मुंडे, विश्व हिंदू परिषदेचे महेश पांडे, भाजपा युवा मोर्चाचे संतोष फडतरे, कसबा महिला आघाडी अध्यक्ष रेखा ससाणे, प्रभाग क्रमांक २९ सरचिटणीस सुनीता संगम, अभिनव विद्यालयाचे पदाधिकारी आदी मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार व लस लाभार्थी महिला, पुरुष, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.