आरोग्यपुणेशैक्षणिक

निरोगी हृदयासाठी नाना पाटेकर यांच्या टिप्स

पुणे: आपल्या चेहऱ्यावर कायम हसू असणे हे सर्वप्रकारच्या त्रासासाठी उत्तम असे औषध आहे. तुमच्या समस्या, दु: ख इतरांना कधीही सांगू नका परंतु तुमचा आनंद सर्वांसोबत नेहमी शेअर करा तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती व्हाल असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी “जागतिक हृदय दिनानिमित्त” सिंबायोसिस तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.

सिंबायोसिस रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे “जागतिक हृदय दिनानिमित्त” आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सिंबायोसिस विद्यापीठाच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसह लवळे कॅम्पस येथे “हेल्दी वॉक” मध्ये नाना पाटेकर यांनी सहभाग घेतला तसेच हॉस्पिटलच्या आवारात अद्ययावत “कार्डियाक ऍम्ब्युलन्स” सुरु करून ऍम्ब्युलन्स चे उदघाटन केले.

सिंबायोसिस संस्थेच्या ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त सिंबायोसिस तर्फे दिनांक २९ सप्टेंबर (जागतिक हृदय दिन) ते दिनांक १० ऑक्टोबर २०२१ (जागतिक मानसिक आरोग्य दिन) रोजी आयोजित “सिम्बिथॉन २०२१” चे फिटकेट ऍप (Fitket App ) च्या माध्यमातून उदघाटन केले.डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष, सिंबायोसिस यांनी आपल्या भाषणात बोलताना “नाम फाउंडेशन” द्वारे केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.डॉ. राजीव येरवडेकर,अधिष्ठाता, आरोग्य विज्ञानशाखा, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. विद्या येरवडेकर, प्र- कुलपती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. रजनी गुप्ते, कुलगुरू,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लेफ्टनंट कर्नल (डॉ) टी. विजय सागर, अधिष्ठाता, सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय, डॉ विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आदी इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.सदर ई-मेल बरोबर कार्यक्रमाची छायाचित्रे जोडलेली आहेत, कृपया जोड तपासावीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!