पुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयविशेषव्यवसायीकशैक्षणिकसामाजिक

“भारत की बेटी” पुरस्कार प्रदान सोहळा उद्या (शनिवारी)

MEDIA WORLD आणि साई बिसनेस कल्ब यांच्या वतीने आयोजन

पुणे: ‘मदर्स डे’च्या पूर्व संध्येला शनिवार दि. १० मे रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत “भारत की बेटी” पुरस्कार प्रदान सोहळा घोले रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन मीडिया वर्ल्ड आणि साई बिसनेस कल्ब यांच्या वतीने होणार असून सोहळ्यासाठी राज्यसभा सदस्य मेधाताई कुलकर्णी, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, बॉलीवूड अभिनेते देव गिल, मा. स्थायीसमिती अध्यक्ष अश्विनीताई कदम, मार्गदर्शक वक्ते दत्ता कोहिनकर, व्यवसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“भारत की बेटी” हा फक्त एक पुरस्कार सोहळा नसून भारत देशाला उज्ज्वल भविष्य देऊ पाहणाऱ्या प्रत्येक माता आणि भगिनींचे सन्मानाचे व्यासपीठ आहे. राष्ट्र प्रथम हे संस्कार बालपणापासूनच आता मुलांना देण्याची आवश्यकता आहे आणि ते आईच उत्तम करू शकते यात शंका नाही. भारत की बेटी हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देईल अशा पवित्र भावना कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुमित जैन यांनी व्यक्त केल्या.

‘भारत की बेटी २०२५’ पुरस्काराचे मानकरी :- सौ. मनीषा गजानन पवार, मधुरा कानडे, सुवर्णा आनंद माने, आशना खोसला, मनीषा श्रीकांत जगताप, सुनंदा पाटील, सारिका जयकुमार बांगर, अश्विनी पटेल, संगीता शंकर समुद्रे, अपेक्षा शंकरराव वायाळ, सायली राजेंद्र ढोले, रुपाली शरद इंगळे, अयोध्या टिळक, शीतल प्रमोद गोळे, डॉ. नीलिमा भारद्वाज, भाग्यश्री देशपांडे, रितू कैला, स्वाती आनंद महेश्वरी, निशा काटे, निशा माने, निर्मला अंगद शेळके, मोनाली Gulhane, अंजली अंकुश मानेकर, श्रीमती रूपा जाधव, सोनाली कृपाल चौगुले, मनिषा नवनाथ रायरीकर, शुभांगी कांदे, डिंपल इंगळे, अंशू जोहरी, गीतसानिया शशांक कुलकर्णी, नेहा ललित कुमार मराठे, प्राजक्ता जाधव, संगीता सुरेश शिंदे, पूनम दत्तात्रय मांढरे, गौरी गिरीश मोटे, यमुना अमोल शिवतारे, धनश्री साखरे बरे, प्रियंका किशोर सूर्यवंशी, आरती योगेश महाले आणि सौ. कांचन काशिनाथ कडू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!