
पुणे (प्रतिनिधी): ‘मदर्स डे’च्या पूर्व संध्येला शनिवार दि. १० मे रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत “भारत की बेटी” पुरस्कार प्रदान सोहळा घोले रोड वरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन मीडिया वर्ल्ड आणि साई बिसनेस कल्ब यांच्या वतीने करण्यात आले असून सोहळ्यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड व साउथ मूवी अभिनेते देव गिल, पुणे मनपा स्थायीसमिती अध्यक्ष अश्विनीताई कदम, मार्गदर्शक वक्ते दत्ता कोहिनकर, व्यवसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत, लेफ्टनंट कर्नल समीर कुलकर्णी, धुमाळ गुरुजी, निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा वाघमारे, मीडिया वर्ल्ड न्यूजचे संचालक सुमित जैन, साई बिझनेस क्लबच्या डॉ. कृती वजीर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

“भारत की बेटी” हा फक्त एक पुरस्कार सोहळा नसून भारत देशाला उज्ज्वल भविष्य देऊ पाहणाऱ्या प्रत्येक माता आणि भगिनींचे सन्मानाचे व्यासपीठ आहे. जात-पात धर्म बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम हे संस्कार बालपणापासूनच आता मुलांना देण्याची आवश्यकता आहे आणि ते आईच उत्तम करू शकते यात शंका नाही. भारत की बेटी हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देईल अशा पवित्र भावना कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुमित जैन यांनी प्रास्ताविक भाषणात व्यक्त केल्या.
‘भारत की बेटी २०२५’ पुरस्काराचे मानकरी म्हणून सौ. मनीषा गजानन पवार, मधुरा कानडे, सुवर्णा आनंद माने, आशना खोसला, मनीषा श्रीकांत जगताप, सुनंदा पाटील, सारिका जयकुमार बांगर, अश्विनी पटेल, स्वप्नजा लोमटे, संगीता शंकर समुद्रे, अपेक्षा शंकरराव वायाळ, सायली राजेंद्र ढोले, रुपाली शरद इंगळे, अयोध्या टिळक, शीतल प्रमोद गोळे, डॉ. नीलिमा भारद्वाज, भाग्यश्री देशपांडे, रितू कैला, स्वाती आनंद महेश्वरी, निशा काटे, निशा माने, निर्मला अंगद शेळके, मोनाली Gulhane, अंजली अंकुश मानेकर, श्रीमती रूपा जाधव, सोनाली कृपाल चौगुले, मनिषा नवनाथ रायरीकर, शुभांगी कांदे, डिंपल इंगळे, अंशू जोहरी, गीतसानिया शशांक कुलकर्णी, नेहा ललित कुमार मराठे, प्राजक्ता जाधव, संगीता सुरेश शिंदे, पूनम दत्तात्रय मांढरे, गौरी गिरीश मोटे, यमुना अमोल शिवतारे, धनश्री साखरे बरे, प्रियंका किशोर सूर्यवंशी, आरती योगेश महाले आणि सौ. कांचन काशिनाथ कडू यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र, मेडल, आणि तिरंगा शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या भाषणात ‘भारत की बेटी’ या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वरमयी नृत्य निकेतन पुणे यांच्या कलाकारांनी गणेश वंदना आणि आदिशक्तीला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गार्गी देशपांडे आणि शेख निम्रा यांनी केले तर आभार डॉ. कृती वजीर यांनी मानले.