पुणे: शारदीय नवरात्रोस्तवाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सलग दुसऱ्यावर्षी साधेपणाने नवरात्रौत्सव साजरा करण्यास राज्यसरकारने परवानगी दिलीय. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मंडई परिसरातील धनलक्ष्मी सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रतिष्ठिन च्या वतीने घटस्थापना करण्यात आली .कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गेल्या २ वर्षांपासून मंदिरे बंद आहेत , घटस्थापनेच्या दिवशी राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा आदेश दिल्याने धनलक्ष्मी प्रतिष्ठान च्या वतीने फटाके फोडून देवीचे आगमन करण्यात आले तसेच सरकारच्या आदेशाचे स्वागत करण्यात आले.
भाविकांसाठी सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार उसत्व साजरा करण्यात येत असून या वर्षी दांडिया जरी होत नसल्या तरी उसत्वला परवानगी मीळाल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत.शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून माक्स , सॅनिटायजर , शारीरिक अंतर ठेऊन भाविकांना दर्शन देण्यात येईल तसेच यावर्षी नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा केला तरी पुढच्यावर्षी मात्र मोठ्या उस्थाहात नवरात्रौत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सौरभ बाळासाहेब आमराळे सांगितले . यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .