आरोग्यपुणेराजकीयसामाजिक

नगरसेविका रुपाली दिनेश धाडवे यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे सन्मान

सन्मान माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना समर्पित- रूपाली दिनेश धाडवे

पुणे: दक्षिण पुणे भागातील कार्यक्षम नगरसेविका रूपाली दिनेश धाडवे यांच्या कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. मेहबूब सय्यद (महाराष्ट्र उपाध्यक्ष वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन) यांच्या हस्ते सन्मानाचे प्रशस्तीपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनेश धाडवे, तृप्ती अग्रवाल (महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट) अनिता हिवरकर (वरिष्ठ पोलीस निरिक्षक बिबवेवाडी गुन्हे शाखा पोलिस स्टेशन ) सिकंदर सय्यद आदी मान्यवर, कार्यकर्ते, व महिला तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

कोरोना काळात अप्पर सुपर बिबवेवाडी प्रभागात नगरसेविका रुपाली धाडवे यांच्यातर्फे गोर गरीब लोकांसाठी अन्नधान्य वाटप, प्रभागात निर्जंतुकीकरण करणे, रक्तदान शिबिर, कोरोना लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण अशा विविध उपक्रमाद्वारे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फ़े हा सन्मान करण्यात आला.

सन्मानाला उत्तर देत नगरसेविका रूपाली धाडवे म्हणाल्या, कोरोना च्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे कार्य केले. लोकांचे हित जोपासणे व त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी यापुढेही सदैव काम करीत राहील. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे देण्यात आलेला हा सन्मान माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना समर्पित करीत आहे. असे म्हणत नगरसेविका रूपाली धाडवे यांनी संस्थेचे आभार मानले.

अनिता हिवरकर म्हणाल्या, नगरसेविका रुपाली धाडवे यांनी करोना काळात उत्कृष्ट कार्य केले त्याचीच दखल लंडन येथील संस्थेने घेतली आहे त्यांचे पती दिनेश धाडवे हे सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे आहे येणाऱ्या पुढील काळात देखील रूपाली यांनी नागरिकांची अशीच काळजी घ्यावी असे मत व्यक्त करत त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!