
पुणे: शहरातील मध्यवर्ती ठिकाण शनिवार वाडा, भाऊ रंगारी गणेश मंडळा जवळ नव्याने निर्माण होत असलेल्या धनम डेव्हलपर्स निर्मीत ‘जय गणेश व्यापार संकुलाचे भूमिपूजन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या हस्ते बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी धनम डेव्हलपर्सचे प्रवर्तक व शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल, उद्योजक कृष्णकुमार गोयल, पुणे मनपाचे स्थायी समिति अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, डि.वाय पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, बाळासाहेब भांडे, प्रशांत राणे, बुलढाणा बँकेचे रिजनल मॅनेजर योगिनी पोकळे, नगरसेवक विशाल धनवडे, देशपांडे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून धनम डेव्हलपर्सच्या “जय गणेश व्यापार संकुलाला व गोयल परिवाराला शुभेच्छा दिल्या.
ना. डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की मराठी माणसाने उद्योग व्यवसायात पुढे यावे; या प्रेरणेतून आनेक कार्यकर्ते समाजकारण, अर्थकारण व राजकारण एकत्र करतात. शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल व्यवसाय करीत असताना गरजू ५० हजार नागरिकांना खिचडी वाटप, मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ५०० नवप्रसूत महिलाना आवश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
या जय गणेश संकुलाच्या यशासाठी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या समवेत उद्योजक आनंद गोयल, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच मासाहेब मीनाताई ठाकरे सन्मान योजने अंतर्गत ना.नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार ५०० नवप्रसूत मातांना आवश्यक किट देणार असल्याचे आनंद गोयल यांनी यावेळी जाहीर केले.