पुणेराजकीयसामाजिक

आनंद सवाणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल -आनंद सवाणे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सवाने यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचींतन सोहळ्या निमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप तसेच ताडीवाला रोड येथील जनसंपर्क कार्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नविन फलकाचे अनावरण माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका लताताई राजगुरू, नगरसेवक प्रदिप गायकवाड, राष्ट्रवादी पुणे सरचिटणीस हरिष लडकत, कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहूल तांबे, महिला अध्यक्ष मीना पवार, ब्लॉग अध्यक्ष जयकुमार राघवाचारी, विट्ठलदादा गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे निलेश गायकवाड, दशरत शेट्टी, मिलिंद जाधव, आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विद्यार्थी व बाल गोपाल उपस्थित होते.

धम्मपुजन व प्रार्थना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर आलेल्या सर्वानी आनंद सवाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर माता रमाई स्मारक समिती तर्फे सवाणे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत जगताप म्हणाले, आंनद सवाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. अनेक लोक जनसंपर्क कार्यालय उघडतात किंतु ते नागरिकांच्या सेवेत अविरतपणे चालू ठेवणे अनेकदा शक्य होत नाही. सवाणे हे गेल्या वर्षभरापासून कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी व्यवस्थीत करत आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा फायदा पक्षाला नक्की होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आनंद सवाणे यांना वाढदिवसाच्या व कार्यालय वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

आनंद सवाणे म्हणाले, वडीलांच्या आशिर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आलो. आज या मतदार संघाचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना न्याय देण्यासाठी सदैव सेवा देण्यासाठी तैयार असतो. आज वाढदिवसाच्या व जनसंपर्क कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शब्द देतो की, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता येऊन महापौर राष्ट्रवादीचाच होईल असे म्हणत उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!