पुणेमनोरंजनव्यवसायीक

‘स्त्रीशक्ती’ दिवाळी शॉपिंग फेस्टिवलमध्ये करा मनसोक्त खरेदी

दिवाळीला लागणाऱ्या वस्तूंचे शंभराहून अधिक स्टाल एकाच छताखाली उपलब्ध

पुणे: दिवाळीची खरेदी करणार्यांना ग्राहकांना आनंदाची बातमी म्हणजे श्री शिवाजीभाई ढमढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीने ‘स्त्रीशक्ती’ दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. येथे दिवाळीला लागणाऱ्या वस्तू ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध असून यात रांगोळी, आकाशकंदील, फराळ, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने, कपडे, मसाले, चटणी,पापड, आदि गृहोपयोगी शंभराहून अधिक स्टाल तसेच अल्पोपअहारासाठी फुड स्टाल व गाडी लावण्यासाठी मनमोकळी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.

श्री शिवछत्रपती मंगल कार्यालय, अहिल्यादेवी चौक, धनकवडी पुणे येथे आयोजित केलेले स्त्रीशक्ती’ दिवाळी शॉपिंग फेस्टिवल सर्वांसाठी आज शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर आणि उद्या रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले असणार आहे.

स्थानिक महिला व्यवसायीकांना उंच भरारी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी युवा नेतृत्व सुशांत ढमढेरे यांनी या फेस्टिवलच्या माध्यमातून मोफत व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, प्रत्येकाला व्यवसाय मिळाला यासाठी नागरिकांना खरेदी करण्याकरिता आवाहन देखील कले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!