पुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

काझड व शिंदेवाडी गावातील भूमिपुत्रांचा स्नेहमेळावा संपन्न

गावातील भावी पिढीचा शैक्षणिक पाया सक्षम करण्यासाठी करणार काम

इंदापूर (ता.): गेल्या दहा वर्ष्यांत विविध पदावर प्रशासकीय सेवेत सेवा दिल्या नंतर आज पहिल्यांदा गावाच्या वतीने सत्कार स्विकारतांना मनस्वी आनंद होतोय. या स्नेह भेटीतून गावातील भावी पिढीला एक दिशा प्रेरणा मिळेल अशा भावना व्यक्त करत तहसीलदार सौ. स्वाती वाघमोडे यांनी गावातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

दिवाळीच्या पुर्व संध्येला इंदापूर तालुका जिल्हा पुण्यातील काझड व शिंदेवाडी गावातील भूमिपुत्रांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी त्या बोलत होत्या. छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमला डी. एन. पांढरे (प्राचार्य), सोमनाथ मोरे (उदयोजक), नाईक तहसीलदार गणेश लव्हे, नाईक तहसीलदार सौ. स्वाती वाघमोडे, प्रा. तुकाराम माळवे सर, संतोष डिंबळे (उद्योजक), अनिल शिंदे, प्रा. श्रीकृष्ण सावंत, बाळासाहेब नरुटे, नानासाहेब नरुटे, रामदास चव्हाण (उद्योजक), सावता बोराटे (सरपंच शिंदेवाडी), तानाजी पाटील, बाळासाहेब माळवे, अँड. शोभा माळवे, बाळासाहेब म्हेत्रे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, श्री. छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग, न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय काझड शिक्षकवृंद उपस्थित होते.

भूमिपुत्रांनी स्वतःचा परिचय देत सद्या करत असलेले काम व आगामी उपक्रम विषयीची माहिती मनोगतात व्यक्त केली. तसेच या वेळी गुरुजन वर्गांचा विषेश सन्मान सर्वांच्या वतीने करण्यात आला. सर्वाच्या सहकार्याने गावासाठी काय करता येईल या विषयावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करू असे आश्वासन उपस्थितीच्या वतीने देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जि.प.प्रा.शाळा काझड मधील १९९६ सालची इयत्ता सातवीतील बॅच यांनी केले होते. आयोजनामध्ये जालिंदर म्हेत्रे, श्रीकृष्ण सावंत, दत्तात्रय माळवे, रामदास चव्हाण, महेश गाडेकर, सचिन धायगुडे, नितीन धायगुडे, कांतीलाल नरुटे, लालासाहेब नरुटे, राजेंद्र पाटील, राहुल नरुटे, तुकाराम डोंबाळे, यांचे विशेष योगदान होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम सावंत यांनी तर सूत्रसंचालन अनिल रुपनवर, आभार जालिंदर म्हेत्रे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!