क्रीडापुणेविशेष

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चांगल्या आरोग्यासाठी धावणे काळाची गरज- ए नारायण स्वामी

Pune: क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ए नारायण स्वामी राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विकास मंत्रालय भारत सरकार यांनी झेंडा दाखवून तसेच मशाल पेटवून ही मॅरेथॉन सुरू झाली. या प्रसंगी आमदार सुनील कांबळे आयोजकन प्रकाश वैराळ, सुनील खंडागळे उपस्थित होते.

स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा ते संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती स्थळापर्यंत ही मॅरेथॉन पार पडली. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तरुण व तरुणी यांचा सहभाग मोठया प्रमाणात होता. या प्रसंगी बोलताना ए नारायण स्वामी म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवन आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. या आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मॅरेथॉन चांगल्या आरोग्यासाठी रोज ३० ते ४० मिनिट देणे गरजेचे आहे.

स्पर्धाचा समारोप संगमवाडी लहुजी वस्ताद साळवे स्मृतीस्थळ येथे झाला सहभागी झालेल्या स्पर्धांकांचा श्रीफळ सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी महेश करपे (पुणे महानगर कार्यवाहक कार्यवाहक), सुधाकर जाधवर (पुणे विद्यापीठ समिती व्यसवस्थापन समिती सदस्य) मा आमदार सुनिल कांबळे, जगदीश मुळीक (पुणे शहर भाजप अध्यक्ष ), अशोक लोखंड, सुनील भंडगे, सुधाकर जाधव, महेश करपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!