भारतीय संविधान दिनानिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
पँथर्सनी दिल्या "हम सब एक है" च्या गगनभेदी घोषणा

पुणे: २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशात विविध राज्य, विविध भाषा, धर्म, जाती असून सर्वाना एक सुत्रात बांधून एक न्याय कायदा देण्यार्या संविधान प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करून “हम सब एक है” अशा गगनभेदी घोषणा यावेळी करण्यात आल्या.
पुण्याचे खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांना दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब भोसले व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इलियास भाई शेख यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच मुंबई येथे २६/ ११ च्या भ्याड हाल्यात शहिद झालेल्या जवानांना आदरांजली वाहन्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी दलित पँथर ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष शाहरूख पठाण, मेहबूब मणियार, हेमंत वैराट, शशिकांत नाईक, जावेद शेख, सोनू सय्यद, इकबाल सय्यद, तन्वीर शेख, सिमरन सय्यद, सागर भालेराव, परवेज शेख, राहुल भोसले आदी पदाधिकारी तसेच संविधान प्रेमी व आंबेडकर वादी नागरिक उपस्थित होते.