पुणेमनोरंजनमहाराष्ट्र

महिला सक्षमीकरणासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती 2021” स्पर्धेचे आयोजन

सुजाता परदेशी ठरल्या "महाराष्ट्राची सौभाग्यवती 2021" स्पर्धेच्या विजेत्या

पुणे : कुसुमवत्सल्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राची सौभाग्यवती 2021, पर्व दुसरे स्पर्धेचा महाअंतिम सोहळा दापोली, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत राज्यातील विवाहित सौंदर्यवतीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. राज्यात पहिल्यांदाच या स्पर्धकांनी समुद्र किनाऱ्यावर रॅम वाकचा सराव केला. स्वागत, परिचय, विंडो वेस्टर्न संस्कृती आणि प्रश्न उत्तरे अशा फेऱ्या स्पर्धेत घेण्यात आल्या. कोरीओग्राफी अतुल आगळे आणि सुजाता यादव ह्यांनी केले.

नौकरी, व्यवसाय, घर सांभाळणार्‍या महिलांच्या कलागुणांना मंच उपलब्ध करून; एका वेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करावे, त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांनी केले होते. स्पर्धेच्या क्राऊन स्पॉन्सर SDR फाऊंडेशन च्या फाऊंडर सीमा इंग्रोले, आणी सोन्यांची नथ, सोनाई ज्वेलर्स. सोनाली सोनार आणि पैठणी साडी कलारुपम चे दिलिप वागू ह्यांनी केली.

कुसुमवत्सल्य फाउंडेशन आयोजित “महाराष्ट्राची सौभाग्यवती 2021” पर्व दुसरे, फॅशन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात सुजाता परदेशी विजेती ठरल्या, आणि स्टार विनर दीपा कुलकर्णी, तर उत्तेजनार्थ नारायणी केदारी, आदिती सांगळे,सोनाली पवार, संगीता देव्हारे विजयी ठरल्या. महाअंतिम फेरीतील 40 स्पर्धकांमधून सब टायटल साठी सविता मुनोत, शितल निलंगेकर, जिनल फडतरे, दिपाली पंडित, कविता कोळी आणि नम्रता बिराडे यांची निवड करण्यात आली.

महाअंतिम स्पर्धेतचे ज्युरी म्हणून रोहित शिंदे, श्रुतिका गाओक्कर, विवेक शर्मा, मेघा जोशी आणि अनामिका ओव्हाळ यांनी काम पाहिले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वालम, दिनेश वालम, शरद मोरे, , अनिल इंग्रोले, नारायण कुलकर्णी, निशा पाटील, नेहा घुगे, इंदिरा अहिरे, , अभिजित,, आरती निढाळकर, विद्या कोतवाल, अस्मिता आपटे, अनुजा शितोळे, आनंद भावे, अरविंद उपस्थीत होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंजली माने, हर्ष वर्धन पाटील, हिमांशू महाजन, हिमांशू शिंदे यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन = सुरभी हेमंत ह्यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!