शोर्य दीनाचे नियोजन व सूचना आदींच्या संदर्भात सर्व आंबेडकरी विचार संघटना व पक्ष यांची बैठक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार निमंत्रण

पुणे: १ जानेवारी २०२२ रोजी भिमाकोरेगाव विजय स्तंभ शोर्य दीनाचे नियोजन व सूचना आदींच्या संदर्भात पुणे जिल्ह्याधाकारी कार्यालय येथे सर्व आंबेडकरी विचार संघटना व पक्ष यांची बैठक आज जिल्हा अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती . यामध्ये पुणे जिल्हा अधिकारी देशमुख, मा पोलिस उपआयुक्त , सर्व पुणे शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी, दलीत पँथर ऑफ इंडिया राष्ट्रीयाचे संस्थापक अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्ती चे भारताचे राजदूत बाप्पुसाहेब भोसले विशेष उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनूसार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येईल तसेच शौर्य दीन अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना व भीम अनुयायांना मोफत बस सेवा, विशेष आरोग्य सेवा, विजय स्तंभ येथे फुलांची सजावट, पार्किंग व मार्गदर्शक रूट उपलाभ करून देने, बुद्ध भीम गीत प्रबोधन साठी स्टेज जागा उपलब्ध करून देणे , सभा आयोजन साठी परवानगी व नियमवली जाहीर करने आदी प्रस्ताव देखील बैठकीत मांडले गेले.