आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

पत्रकार दिनानिमित्त दक्षिण पुण्यात ऑरा हॉस्पिटलतर्फे पत्रकारांचा सन्मान

बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी ‘पत्रकार दिन’

पुणे: लोकशाहीची चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या पत्रकारांचा हा दिवस विशेष आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘पत्रकार दिन’ हा ६ जानेवारीला घोषित केला आहे.

जगाच्या प्रत्येक कोनातील इत्यंभुत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आपली तहानभूक विसरुन पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील प्रत्येक घडामोडीबद्दल सविस्तर माहिती तुमच्या-आमच्या पर्यंत पोहोचवतात. अशा या धाडसी पत्रकारितेला आणि हे काम अगदी निष्ठेने पार पाडणा-यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस.

आजच्या दिवसाचे औचित्य साधुन कात्रज परिसरातील हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालाजी कल्याणे व क्रेस्ट शिक्षण संस्थेचे योगेश कल्याणे यांच्या वतीने धनकवडी परिसरात पुढारी वृत्तपत्राचे गायकवाड, प्रभातचे संतोष कचरे, धिरेंद्र गायकवाड, पुण्यनगरीचे संतोष गाजरे, मिडीया वल्डचे सुमीत अंबेकर, महाराष्ट्र दर्पणचे ज्ञानेश्वर जाधव, युवा संवादचे धनराज गरड यांना गुलाबपुष्प देऊन या पत्रकार बंधुचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ऑरा हॉस्पिटलचे प्रसिद्धी प्रमुख अनिल रेलेकर व इतर कर्मचारी वर्ग तसेच यश कम्प्युटरचे मोरे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!