युवा भिम सेना सामाजिक संघटनेचा चौथा वर्धापन दिन सोहळा
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कोरोणा योद्धा व समाजभूषण पुरस्काराने सन्मान

पुणे : युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा ४ था वर्धापन दिन सोहळा पुणे सातारा रोड पद्मावती अण्णा भाऊ साठे सभागृह येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला. वर्धापन दिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व येणाऱ्या काळात संघटनेला जी मदत लागेल त्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
युवा भिम सेना सामाजिक संघटने तर्फे विवीध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कोरोणा योद्धा व समाजभूषण पुरस्काराने सन्मान केला. यामधे रोहित शिंदे, सागर बारणे, गणेश गांधी, सनी डाडर, पोलिस कर्मचार प्रवीण कोकणे, राजू जांभळे, अमित पनमरे, विनोद होनराव यांना covid-19 पुरस्कार तर गणेश भालेराव यांना समाज भूषण पुरस्कार, सुशांत ढमढेरे, विठ्ठल दादा वरुडे पाटील यांना दलित मित्र पुरस्कार आणि रोहन कांबळे, अखिल शेख यांना शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. माय माऊली केअर सेंटर ल चादरी वाटप करण्यात आली.
याप्रसंगी शशी भिसे, नागेश भाऊ अडसूळ, गणेश भाऊ मोहिते, सुशांत भैय्या ढमढेरे, संतोष भाऊ खाडे, संध्याताई नांदेड, गणेश भाऊ गांधी, सागर भाऊ बारणे, अनिल हातागळे, गणेश भालेराव, बंडू शेठ नवघणे, शेखर अण्णा चव्हाण, विठ्ठल दादा वरुडे पाटील, संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिल कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करुन पत्र हि देण्यात आले.