भारतातील स्ट्रीट-स्मार्ट कार: एमजी कॉमेट ब्लॅकस्टॉर्मचे पुणेमध्ये अनावरण
• भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट केवळ 4.99 लाख रूपयांपासून सुरू होते, आणि बॅटरी भाडे फक्त 2.5 रूपये प्रति किलोमीटर आहे

पुणे, 24 एप्रिल 2025 – जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने भारतातील स्ट्रीट-स्मार्ट कार एमजी कॉमेट चा नवा ब्लॅकस्टॉर्म एडिशन पुणे सादर केला. आकर्षक डिझाइन आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही कॉमेट ब्लॅकस्टॉर्म ही कारची टॉप व्हेरिएंट आहे. ती बॅटरी-ऍज-अ-सर्व्हिस (बीएएएस) मॉडेलनुसार 7.80 लाख रूपये + 2.5 रूपये प्रति किमी या किमतीत मिळते. जे ग्राहक स्टायलिश आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण शहरात चालवण्यायोग्य कारच्या शोधात आहेत, त्यांनी आता पुणेमधील एमजी शोरूमला भेट देऊन फक्त 11,000/- रूपये भरून नवीन एमजी कॉमेट ब्लॅकस्टॉर्म ची बुकिंग करता येईल.एमजी कॉमेट ब्लॅकस्टॉर्म आपल्या ‘स्टारी ब्लॅक’ रंगातील बाह्य रचनेमुळे उत्कृष्ट शैली आणि दर्जाचा अनुभव देते, ज्यामुळे गाडीचा आकर्षकपणा आणखी वाढतो.
कॉमेट ईव्ही हे नाव डार्क क्रोममध्ये कोरलेले असून, ‘इंटरनेट इंसाईड’ हे चिन्ह ब्लॅक कलर मध्ये सादर करण्यात आले आहे, जे सहजच सर्वांचे लक्ष वेधून घेतं. गाडीच्या आतील सजावटीतही ब्लॅक थीम कायम ठेवण्यात आली असून, लेदरेट सीट्सवर ‘ब्लॅकस्टॉर्म’ हे नाव रेड कलर मध्ये भरतकाम करून दिले आहे, जे एक दर्जेदार आणि प्रीमियम अनुभव प्रदान करते.

संगीतप्रेमींसाठी, कंपनीने कॉमेट ब्लॅकस्टॉर्म मध्ये आता 4 स्पीकर्स दिले आहेत, जे ट्रॅफिकमधील गोंगाटातही मन प्रसन्न करणारा संगीत अनुभव देतात. या नव्या व्हेरिएंटमध्ये 17.4 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला समर्थन देते आणि 230 किलोमीटर* ची प्रमाणित रेंज देते. ग्राहक आपल्या कॉमेट ब्लॅकस्टॉर्म ला आणखी खास आणि वैयक्तिकृत करण्यासाठी एक विशेष अॅक्सेसरी पॅक घेऊ शकतात, ज्यामध्ये युनिक बॅज, व्हील कव्हर, तसेच पर्यायी स्टाईलिंग घटक जसे की हुड ब्रँडिंग आणि स्किड प्लेट्स यांचा समावेश आहे.

यावर टिप्पणी करताना, बी यू भंडारी, डीलर प्रिंसिपल, एमजी पुणे यांनी सांगितले, “एमजी कॉमेट ईव्ही हे पुणे औद्योगिक शहरासाठी एक आश्वासक उत्पादन आहे. आधुनिक भारतीय खरेदीदारांची बदलती आवड अशी आहे की त्यांना अशी गाडी हवी आहे जी त्यांच्या स्टाइलिश व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते आणि एमजी कॉमेट ब्लॅकस्टॉर्म त्यांना विशेष बनवण्यास मदत करेल. कॉमेटच्या या नवीन आवृत्तीसोबत, स्टायलिश ब्लॅक एक्सटेरियर्स आणि प्रगल्भ डिझाइनसह दररोजच्या प्रवासाचा अनुभव उत्तम होईल, आणि एमजीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट मालकी अनुभवाचे वचन त्याचप्रमाणे टिकून राहील.”
एमजी कॉमेट ईव्ही शहरी प्रवाश्यांच्या आवश्यक कार्यक्षमतेला त्याच्या इच्छित शैलीसोबत एक सुरक्षित आणि स्मार्ट पॅकेजमध्ये प्रदान करते. कॉमेट ईव्ही च्या विक्रीत कमर्शियल इयर ’24 मध्ये कमर्शियल इयर’23 च्या तुलनेत 29% वाढ झाली आहे, जे कार खरेदी करणाऱ्यांमध्ये त्याच्या मजबूत स्वीकारार्हतेचे संकेत आहे. त्याच्या नाविन्या डिझाइन आणि वापरण्याच्या सोयीमुळे ते देशभरातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाले आहे, ज्यामुळे ते स्टायलिश आणि पर्यावरणपूरक गतिमानतेसाठी एक आवडती निवड बनली आहे.