पुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

एमआयटी डब्ल्यूपीयूत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

जगातील महान आदर्श जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज - प्रा.डॉ. विश्वनाथ कराड

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कोथरुड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, गरीष दाते, डॉ. महेश थोरवे, डॉ. शांतीनी बोकिल, डॉ. विक्रम गायकवाड, विभाग प्रमुख व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एक महान आदर्श जाणते राजे होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतल्यानंतर जनतेच्या मना मनात स्वधर्म, स्वाभिमान, आणि स्वत्व जागृत करण्याचे कार्य केले. प्रखर राष्ट्रप्रेमी, निधड्या छातीचे, धैर्यशील, क्रियाशील आणि रतेच्या कल्याणविषयी सदैव दक्ष असे राजे होते. विद्यार्थ्यांनी छत्रपतीचा कार्यांच्या आदर्श घेऊन त्यांच्यातील एकतरी गुणाचा अंगिकार केल्यास जीवन सार्थक होईल.”

डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“ छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकाच जीवनात ५०० वर्षांचे कार्य केवळ ५० वर्षात करुन दाखविले आहे. जे या सृष्टीवर कोणालाही शक्य नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी.”

डॉ. अर्चना चौधरी म्हणाल्या,“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व मूल्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनात उतरविण्यासाठी प्रत्येक प्राध्यपकांची भूमिका महत्वाच असून तेच खरे योगदान असेल.”

प्रा.सचिन गाडेकर यांनी स्वागत पर भाषण केले.निरंजन खैरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!