
Pune: आनंदाची व्याख्या किती सोपी असते, चेहऱ्यावर हसू फुलले की आभाळ ठेंगणे होते. असाच काही अनुभव आज प्रा foundation च्या दिव्यांग मुलांनी अनुभवला, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आज या मुलांसाठी special मेट्रो सफर चे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.पूण्यातील वनाज स्टेशन ते गरवारे स्टेशन व परत वनाज हा एक तासाचा मेट्रोचा प्रवास मुलांच्या स्वप्नांची पूर्ती करणारा ठरला.
भरपूर गाणी, नाच तसेच भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी हा सर्व परिसर दुमदुमून गेला. आज मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुण्याची शान ठरलेल्या या मेट्रोला पूर्ततेचे समाधान देऊन गेला.आजच्या या संपूर्ण नियोजन बद्ध कार्यक्रमाला Metro corporation ने त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने उत्तम साथ दिली. व्हील चेअर वरील मुलांना लिफ्ट मधुन नेऊन मेट्रो मध्ये बसवेपर्यंत, सोबत मेट्रो चे व सुरक्षितेचे नियम पाळत संपूर्ण सहकार्य केले.प्रवाशांची घेतलेल्या काळजीने मेट्रो कॉर्पोरेशन ला उंचीवर नेऊन ठेवले.
महासंघातर्फे कमलेश जोशी, विकास अभ्यंकर, सानिका खरे,राहुल व अनुपमा जोशी, श्री व सौ माधवी कुंटे तसेच प्रा फौंडेशन च्या सर्वेसर्वा डॉ प्राजक्ता कोळपकर व त्यांचा कर्मचारी वर्ग तसेच दिव्यांग मुले असे पन्नास लोक यांनी हा अनोखा अनुभव घेतला.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आशीर्वाद रुपी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागे सदैव उभा राहील यात शंका नाही.
एक अनोखा अनुभव, अनोखी मेट्रो सफर