महाराष्ट्रविशेषव्यवसायीकशैक्षणिक

“डिजिटल साक्षरतेमुळे उद्योग व्यवसायाला चालना”

कावेरी मीडिया आणि बॅनियन ट्रीज सोल्युशनतर्फे "डिजिटल" शिबिराचे आयोजन

पुणे: प्रत्येक उद्योग व्यवसायिक आणि राजकीय व्यक्तींना आज आपली जाहिरात केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय आपला उद्योग व्यवसाय वाढीस लागणार नाही. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. त्यामुळे आज प्रत्येकाला डिजिटल शिक्षण घेणे आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन डिजिटल एक्स्पर्ट पुष्कर मालवणकर यांनी केले.

पुणे येथील आपटे रोड येथे कावेरी मीडिया आणि बॅनियन ट्रीज सोल्युशन यांच्या वतीने डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षण शिबिरास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे शहराध्यक्ष शिवाजी मते, घाडगे पाटील ग्रुपचे पुणे विभागाचे अधिकारी मोहन पाटील, ऑनलाईन डिजिटल एक्स्पर्ट मयूर गलांडे (सब एडिटर : ऑनलाईन लोकमत) ऑनलाईन प्रभातचे रवी देशमुख, जिओ कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रशांत कोरे, ३ KM चे विरेश आंधळकर, बॅनियन ट्रीज सोल्युशनचे हर्षल देशपांडे, कावेरी मीडियाचे शरणू जवळगी, अतिश पाटील त्याचबरोबर शिबिरात सहभागी झालेले नोकरदार वर्ग, गृहिणी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मयूर गलांडे म्हणाले, जगभरात इंटरनेट सेवा जेव्हा अल्प दरात मिळणे सुरु झाले तेव्हापासून खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती होण्यास सुरुवात झाली. आज जगातील प्रत्येक घटक इंटरनेट शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात असाल तर आपल्याला इंटरनेटचा आधार घ्यावाच लागेल. उद्योग व्यवसायिक आणि राजकीय व्यक्तींना सोशल मीडिया हे माध्यम अल्प दरात वापरून आपली समाजामध्ये प्रतिमा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविता येत आहे. परंतु याचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. यातील बारकावे शिकून आपला व्यवसाय कसा वाढीस लागेल हे पाहावे लागेल.

शरणू जवळगी म्हणाले, आम्ही २०१७ पासून डिजिटल शिबिरास सुरुवात केली. आतापर्यंत १९ शिबिरे घेतली असून यामाध्यमातून जवळपास २०० पेक्षा जास्त व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या काहींनी आपला स्वतः चा व्यवसाय वाढविला असून काहींनी विविध प्रकारची कामे करून डिजिटल कंपनी सुरु केली आहे. येणाऱ्या काळातही या विषयावर सातत्याने काम करत राहणार आहे.

डिजिटल शिबीर आयोजन करण्यासाठी 9011122680/ 9850577550 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!