पुणेमहाराष्ट्रराजकीय

गणेश नाईक यांनी डीएनए करून लोकांसमोर सत्य आणावे : डॉ. नीलम गोऱ्हे

गणेश नाईक यांनी डीएनए करून लोकांसमोर सत्य आणावे : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : नवी मुंबईचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्याकडून एका पीडित महिलेने तिला मूल असून त्याला संपूर्ण अधिकार देण्याची मागणी केल्याचे नुकतेच प्रसार माध्यमातून समजले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी श्री. नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करून सदर मुलाच्या पालकत्व बाबत वस्तुस्थिती जनतेच्या समोर स्पष्ट करावी, तसेच आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात त्यांनी श्री. नाईक यांचे कार्यकर्ते तसेच त्यांचे पुत्र हे संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याबाबत देखील गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

कोणत्याही लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने असे बेजबाबदार वर्तन करून जनतेच्या मनातील प्रतिमा मलिन करणे हे निश्चितच खेदजनक आहे. जनतेनेही अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!